शेअर्स मार्केटमध्ये रेल्वेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. IRFC ते IRCTC पर्यंतच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. NSE वर गेल्या एका महिन्यांपासून रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडचे शेअर्स ९३ टक्क्यांनी वाढले आहेत. तर रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सने ८७ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. (Latest Marathi News)
IRCTCच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात २९ टक्के रिटर्न दिले आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या बजेटआधीच टीटागड रेल सिस्टम्सचे शेअर्सने एका महिन्यात १९ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाआधीच रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, प्रभुदास लीलाधर यांनी म्हटलं की, 'सध्या रेल्वेने आधुनिकीकरण आणि वंदे भारत ट्रेन्सवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेचं आर्थिक वर्ष २४ एप्रिल-नोव्हेंबरमध्ये भांडवली खर्चात ३१ टक्के वाढ केली आहे. रेल्वेचा हा खर्च इतर विभागांपेक्षा अधिक आहे'.
रिपोर्टनुसार, एलारा कॅपिटलने म्हटलं की, 'सरकार आता रेल्वे, रोड आणि डिफेंन्सच्या खर्चावर प्राधान्य देत आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, बजेटमध्ये या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे'. (Railway Update)
एलारा कॅपिटलने म्हटलं आहे की, आगामी आर्थिक वर्षात भांडवली खर्चात २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रांकडून राज्यांना वर्षाला ३०,०००० कोटी रुपयांचं कर्ज देण्याची शक्यता आहे. तर सरकार भांडवली खर्चातील ६० टक्के हे रस्ते, रेल्वे आणि डिफेन्सवर खर्च करण्याची शक्यता आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.