pakistan police saam tv
Sports

Champions Trophy: पाकिस्तानात खेळाडूंच्या जीवाला धोका? १०० पोलिसांनी पळ काढला; नेमकं काय घडलं?

100 Pakistani Police Officer Sacked During ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान १०० पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २९ वर्षानंतर पाकिस्तानला आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली आहे. मात्र सुरुवातीपासूनच या स्पर्धेला वादाचं ग्रहण लागलं आहे.

आधी भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं संकट असल्याची माहिती समोर आली. आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना १०० पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ज्या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यापैकी काही पोलिस अधिकारी ड्यूटीवर गैरहजर होते. तर काही अधिकाऱ्यांनी इतर कारणांमुळे ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे १०० पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमपासून ते हॉटेलपर्यंत खेळाडूंना हॉटेलपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते अनुपस्थितीत होते तर काहींनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिला.

आपल्या ड्युटीपासून पळ काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आयजीपी पंजाबचे उस्मान अन्वर म्हणाले , मुद्दा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा असतो तेव्हा निष्काळजीपण सहन केला जाणार नाही. पाकिस्तान पोलिसांच्या या कृत्यामुळे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पाकिस्तानला २९ वर्षानंतर आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली होती. जर खेळाडूंच्या सुरक्षेत चूक झाली, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मोठा धक्का बसू शकतो. पीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सोय केली होती. मात्र पोलिसांनी पळ काढल्याने आता टेन्शन वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT