
Champions Trophy 2025 : आज पाकिस्तानमधल्या रावळपिंडीमध्ये दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना खेळला जाणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. वातावरण खराब झाल्याने नाणेफेकदेखील झाली नाही. सामना काही काळानंतर सुरु होणार असल्याची काही वेळापूर्वी शक्यता वर्तवली जात होती. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने हा नियोजित सामना रद्द करण्यात आला.
रावळपिंडीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस सुरु झाला. त्यामुळे मैदानावर नाणेफेक देखील होऊ शकली नाही. दरम्यान पाकिस्तानच्या भोंगळ कारभारामुळे सामन्याला उशीर झाला असे लोक म्हणत होते. स्टेडियमवर पिच झाकण्यासाठी कव्हर्सची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू मौहम्मद कैफ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कैफने 'रावळपिंडीचे मैदान पूर्णपणे कव्हरने झाकलेले नाही. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सारखा महत्त्वपूर्ण सामना यामुळे आधीच रद्द झाला असता. कोणीही याकडे लक्ष दिले नाही. आयसीसीचा पैस यजमानांनी (पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने) योग्य पद्धतीने वापरला का?' असे लिहिले आहे.
दरम्यान रावळपिंडीतला सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना १-१ गुण मिळाला आहे. त्यामुळे ब गटातील लढत चुरशीची बनली आहे. दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. आजचा सामना रद्द झाल्याने उपांत्यफेरीपर्यंत जाण्याच्या समीकरणांमध्ये मोठा फेरबदल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.