Mohammed Siraj set a trap and Zak Crawley saam tv
Sports

Mohammed Siraj: सिराजने रचला सापळा आणि क्रॉली अडकला! इंग्लंडला धक्का देण्यासाठी मियां मॅजिक, वाचा कशी आखली रणनिती

Mohammed Siraj strategy: मोहम्मद सिराजने झॅक क्रॉलीविरुद्ध गोलंदाजी करताना केवळ वेगाचा वापर केला नाही, तर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये रणनीतीचाही समावेश केला. यामुळे टीम इंडियाला एक मोठी विकेट काढण्यात यश मिळालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारत-इंग्लंड टेस्ट सामन्याचा चौथा दिवस आहे.

  • भारताने इंग्लंडला 374 रन्सचे लक्ष्य दिले आहे.

  • सिराजने झॅक क्रॉलीला यॉर्करवर बोल्ड केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजमधील पाचवा आणि अखेरचा सामना सध्या ओव्हलच्या मैदानावर खेळवला जातो. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. या सामन्यात भारतीय टीमने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने एका विकेट मोबदल्यात 50 रन्स केले होते.

या दिवसाच्या शेवटी मोहम्मद सिराजने झॅक क्रॉलीला बोल्ड केलं आणि इंग्लंडला एक मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे क्रॉलीला बाद करण्यासाठी सिराजने आधीपासून एक खास प्लॅन तयार केला होता आणि त्याच योजनेनुसार त्यांनी त्याला जाळ्यात खेचलं आणि आऊट केलं.

सिराजच्या जाळ्यात फसला झॅक क्रॉली

तिसऱ्या दिवशी शेवटची ओव्हर मोहम्मद सिराजने टाकली. या ओव्हरच्या पहिल्या चार बॉलवर क्रॉलीने चांगली फलंदाजी केली. मात्र, पाचव्या बॉलच्या आधी सिराजने मैदानावर फील्डिंगमध्ये बदल केला. त्याने एक फील्डर डीप स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर उभा केला. हे पाहून सगळ्यांनाच वाटलं की, सिराज आता एक जबरदस्त बाऊन्सर टाकणार पण त्याने सगळ्यांना चकवून पुढचा बॉल यॉर्कर टाकला आणि झॅक क्रॉलीला बोल्ड केलं.

सिराजच्या या चलाखीने केवळ इंग्लंडला पहिला धक्का दिला नाही तर भारताला देखील एक मोठी विकेट मिळवून दिली. या विकेटनंतर टीम इंडिया आज म्हणजेच चौथ्या दिवशी अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.

374 रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला झॅक क्रॉली आणि बेन डकेटनं चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र, झॅक क्रॉली 36 बॉल्समध्ये 14 रन्स करून बाद झाला. तर दुसरीकडे बेन डकेट 48 चेंडूत 34 धावा करून नाबाद आहे.

आता चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची जबाबदारी मोठी आहे. इंग्लंडला 324 रन्सची अजून गरज आहे आणि भारताला ही संधी मोठ्या विजयात रूपांतरित करायची आहे. सिराजने दिलेल्या या निर्णायक विकेटमुळे भारताचं पारडं सध्या जड आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्ट सामन्याचे लक्ष्य किती आहे?

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 रन्सचे लक्ष्य ठेवले आहे.

झॅक क्रॉलीला कोणी आणि कसे बाद केले?

मोहम्मद सिराजने त्याच्या योजनेनुसार यॉर्कर टाकून झॅक क्रॉलीला बोल्ड केले.

सिराजने क्रॉलीला बाद करण्यापूर्वी कोणता फील्डिंग बदल केला?

सिराजने डीप स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर फील्डर लावून क्रॉलीला चकवले, पण त्याने बाऊन्सरऐवजी यॉर्कर टाकली.

इंग्लंडची सलामी जोडीने किती धावा केल्या?

झॅक क्रॉली आणि बेन डकेटने पहिल्या विकेटसाठी 50 रन्सची भागीदारी केली.

सामन्याच्या स्थितीनुसार भारताला पुढे काय करायचे आहे?

इंग्लंडला अजून 324 रन्सची गरज आहे, त्यामुळे भारताच्या गोलंदाजांना लवकर विकेट्स घेऊन सामना जिंकायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT