Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

India vs England 2025, 5th Test, Day 3: ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात ३९६ धावा करून बाद झाली. त्यांनी इंग्लंडवर ३७४ धावांची आघाडी घेतलीय.
Ind vs Eng, 5th Test, Day
India vs England 2025, 5th Test, Day 3saam tv
Published On
Summary
  • अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.

  • भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे आव्हान दिलंय.

  • पहिल्या डावात इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली होती.

  • तिसऱ्या दिवशी भारताने जोरदार पुनरागमन करत सामना रोमहर्षक केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. आज (२ ऑगस्ट) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या असून भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य दिलंय.

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली होती. दरम्यान दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने स्फोटक फलंदाजी केली. यशस्वी जैस्वालने अवघ्या ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. या काळात यशस्वीला दोन जीवनदानही मिळाले. पण दुसरीकडे, केएल राहुल (७ धावा) आणि साई सुदर्शन (११ धावा) यांना चांगली कामगिरी करता आली नाही.

Ind vs Eng, 5th Test, Day
Cricketer Death: वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात, आकाश दीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी डाव पुढे नेला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी झाली. आकाश दीपने ७० चेंडूत ९ चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. आकाश दीपने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्धशतक झळकावले. आकाश दीपला बाद करून जेमी ओव्हरटनने ही भागीदारी मोडली. आकाश दीपने ९४ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावा केल्या.

Ind vs Eng, 5th Test, Day
Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

यानंतर तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. गिलने ११ धावा केल्या होत्या. गस अ‍ॅटकिन्सनने त्याला धावबाद केले. गिल बाद झाल्यानंतर लगेचच यशस्वीने त्याचे सहावे कसोटी शतक पूर्ण केले. यशस्वीने १२७ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यशस्वीने १६४ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांसह ११८ धावा केल्या.

दरम्यान हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकला तरच त्यांना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधता येईल. जर ओव्हल कसोटी अनिर्णित राहिली किंवा इंग्लंड जिंकला तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ मालिका गमावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com