Mohammed Shami x
Sports

Mohammed Shami : ४ लाखांमध्ये काय होतं? पत्नी हसीन जहाँनं वाढवलं मोहम्मद शमीचं टेन्शन; न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाली...

Mohammed Shami Wife : कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला त्याच्या पत्नी आणि मुलीला दर महिन्याला चार लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर शमीच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Mohammed Shami News : कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला मोठा झटका दिला. पत्नी आणि मुलीला दरमहा चार लाख रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शमीची पत्नी हसीन जहाँने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात मी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावेन असे हसीन जहाँने म्हटले आहे.

कोलकाता न्यायालयाने मंगळवारी (१ जुलै) मोहम्मद शमीला दरमहिन्याला पत्नीला १.५ लाख रुपये आणि मुलीला अडीच लाख रुपये देण्याचे आदेश दिले. लवकरच हा निर्णय लागू होईल असे म्हटले जात आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने शमीला पत्नीला ५० हजार रुपयेआणि मुलीला ८० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध २०२३ मध्ये हसीन जहाँने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता हसीन जहाँने ४ लाख रुपये कमी असल्याचे म्हटले आहे.

हसीन जहाँने पीटीआयशी संवाद साधला. 'पतीची स्थिती आणि उत्पन्न यानुसार पोटगी निश्चित केली जाते. न्यायालयाच्या निर्देशांनुसार, पतीच्या स्थितीप्रमाणे त्याची पत्नी आणि मुलाचे जीवन असायला हवे. मोहम्मद शमीच्या उत्पन्नानुसार, त्याच्या जीवनशैलीनुसार, ४ लाख रुपये खूप कमी आहेत. सात वर्षांपूर्वी जेव्हा या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा १० लाख रुपयांची मागणी केली होती. आता महागाई वाढली आहे. आम्ही पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय माझ्यासाठी मोठा विजय आहे. यामुळे पुढील विजयासाठीचा एक मोठा मार्ग मोकळा झाला आहे. मी या आदेशाने खुश आहे', असे वक्तव्य हसीन जहाँने केले.

२०१४ मध्ये मोहम्मद शमीने हसीन जहाँशी लग्न केले होते. २०१५ मध्ये त्यांच्या मुलीचा, आयराचा जन्म झाला. शमीशी लग्न करण्यापूर्वी हसीन जहाँ केकेआरसाठी मॉडेल आणि चीअरलीडर म्हणून काम करत होती. २०१८ मध्ये तिने शमीवर घरगुती हिंसाचार आणि हुंडासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून हा खटला न्यायालयात सुरु आहे. दोघेही अद्याप कायदेशीररित्या वेगळे झालेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर परिषदेच्या निवडणूकांची तारीख जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

Election Commission PC Live : आयोगाची पत्रकार परिषद, आयुक्त दिनेश वाघमारेंकडून निवडणुकीची घोषणा

SCROLL FOR NEXT