Micheal Vaughan: 'हा तर इतर संघांवर अन्याय..', टीम इंडियाचं नाव घेता मायकल वॉनचा ICC वर निशाणा
micheal vaughan  twitter/yandex
क्रीडा | T20 WC

Micheal Vaughan: 'हा तर इतर संघांवर अन्याय..', टीम इंडियाचं नाव घेता मायकल वॉनचा ICC वर निशाणा

Ankush Dhavre

आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. दरम्यान सामन्यापूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ICC वर मोठा आरोप केला आहे.

मायकल वॉनचं म्हणणं आहे की, सुपर ८ मध्ये पहिल्या स्थानी असलेल्या संघाचा सामना ग्रुप २ मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध व्हायला हवा होता. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये व्हायला हवा होता. मात्र हा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवला गेला.

काय म्हणाला मायकल वॉन?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं, त्यावेळीच आयसीसीने स्पष्ट केलं होतं की,भारतीय संघ रँकिंगमध्ये कितव्याही स्थानी राहिला, तरी भारतीय संघ गयानामध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळणार. यामागे काय कारण होतं, हे आयसीसीने स्पष्ट केलेलं नाही. मायकल वॉनने ट्वीट करत लिहीले की, 'निश्चितच हा सेमिफायनलचा सामना गयानामध्ये व्हायला हवा होता. मात्र ही स्पर्धा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विचार करुन आयोजित करण्यात आली आहे. हा तर इतर संघांवर अन्याय आहे.'

या स्पर्धेत भारत,दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सेमिफायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अफगाणिस्तानचा डाव फसला. कारण या संघाचा डाव अवघ्या ५६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

S Somnath: '...तर विध्वंस नक्की', पृथ्वीला धडकणार एस्टेरॉयड; इस्रो प्रमुखांनी दिला इशारा

Team India's Victory Parade Live: वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष, थोड्याच वेळात टीम इंडिया येणार मैदानात

Hathras Stampede : स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलगीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?

Pimpri Chinchwad : महापालिकेच्या रुग्णालयात जमा झालेल्या रोख रकमेत घोटाळा; अधिकाऱ्यांकडून रक्कम गायब केल्याचा आरोप

Kalyan Crime : इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप

SCROLL FOR NEXT