आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ वा सामना मुंबई इंडियन्य आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदाराबादने २० षटकअखेर १७३ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला १७४ धावांची गरज आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली होती. या जोडीकडून वादळी सुरुवातीची अपेक्षा होती. दोघांनी मिळून ५६ धावा जोडल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा ११ धावा करत माघारी परतला. तर ट्रेविस हेड ४८ धावांवर माघारी परतला. ट्रेविस हेडला या सामन्यात दोनदा जिवदान मिळालं. त्याला अंशुलने त्रिफळाचित केलं होतं.
मात्र नेमका हा चेंडू नो पडला आणि त्याला जिवदान मिळालं. त्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवरही तो जवळपास बाद झाला होता. मात्र नुवान तुषाराने त्याचा झेल सोडला. मयांक अगरवालही या सामन्यात मोठी खेळी करु शकला नाही. तो अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. नितीश कुमार रेड्डी २० तर हेनरीक क्लासेनने अवघ्या २ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली.
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज.
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवालिक शर्मा, नेहल वढेरा, शम्स मुलानी,डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद,पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मार्को यान्सेन.
इम्पॅक्ट प्लेअर्स – मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग,उमरान मलिक, जयदेव उनाडकट.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.