अमेरिकेनं इराणच्या खर्ग बेटावर केलेल्य़ा भीषण बॉम्बहल्ल्यामुळे अमेरिका- इराण युद्ध आता निर्णायक वळणावर पोहचलयं... लवकरच तिसरं महायुद्ध सुरु होण्याची भिती व्यक्त होतेय... खरंतर अमेरिकेनं केलेला हा हल्ला फक्त एका बेटापुरता मर्यादित नाही तर जगातील सर्वात मोठ्या तेल बाजारपेठेवर आणि अप्रत्यक्षपणे चीनवरील मोठा प्रहार आहे... त्यामुळे अमेरिकेविरोधात आता चीन युद्धात उडी घेणार का? असा सवाल निर्माण झालाय...
खर्ग बेट इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र आहे. तेल निर्यातीपैकी तब्बल 90% वाटा हा एकट्या खर्ग बेटाचा आहे.या बेटावरून सर्वात जास्त तेल निर्यात चीनला केली जाते..युद्धामुळे चीननं रिफाइंड इंधन निर्यातीवर बंदी घालून आपला पुरवठा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलाय... मात्र अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खर्ग बेट निर्यातीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे...खर्गमधील पुरवठा विस्कळीत झाल्यास 2 दशलक्ष बॅरल तेल वाया जाऊ शकते...त्यामुळे अमेरिकेचा खर्गवरील हल्ला चीनसाठी इशारा आहे. चीनला तेलासाठी महागडे पर्याय शोधावे लागतील...
इराणविरुद्ध युद्धाच्या सुरुवातीला अमेरीकेने खर्गवर हल्ला टाळला होता. कारण खर्गवरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ विस्कळीत होण्याचा धोका ट्रम्प यांना सतावत होता...मात्र आता ट्रम्प यांनी खर्गवर केलेल्या हल्ल्यामुळे चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आलीय.. अशावेळी चीन थेट य़ुद्धात सहभागी होईल, अन्यथा इराणला पाठिंबा देऊन अमेरिकेविरोधात नवी रणनीती आखेल..या हल्ल्यामुळे काय धोके निर्माण झालेत पाहूयात..
खर्गवरील हल्ल्यामुळे जगावर तेल संकट अधिक गंभीर होणार आहे.
इराण-इस्रायल युद्धात चीन उडी घेण्याची शक्यता
जागतिक ऊर्जा बाजारपेठ विस्कळीत होईल
तेलाच्या किंमती गगनाला भिडतील
जागतिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडेल
तेल ऑपरेशन्स पुन्हा सुरू झाल्याचा दावा केलाय...तसचं यापुढे अमेरिकेनं इराणच्या तेल सुविधांवर हल्ला केल्यास आखातात युद्धाचा भडका उडेल, असा इशाराही इराणनं दिलाय...तर दुसरीकडे इराणनं होर्मुझ जलमार्गातील सुरुंग काढले नाही तर खर्ग बेट उद्धवस्त करू, असा इशारा अमेरिकेनं दिलाय... त्यामुळे आता चीन इराणला पाठिंबा देऊन अमेरिकेची कोंडी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.