MI vs RR IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan royals match result riyan parag half century amd2000 twitter
क्रीडा

MI vs RR, IPL 2024: मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक ! परागच्या शानदार खेळीच्या बळावर रॉयल्सचा पलटणवर शानदार विजय

Mumbai Indians vs Mumbai Indians Match Highlights: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना पार पडला.

Ankush Dhavre

MI vs RR, IPL 2024 Highlights:

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र घरच्या मैदानावर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी राखून जिंकला आहे. तर हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघाचा या हंगामातील सलग तिसरा विजय आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून रियान परागने अर्धशतकी खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

मुंबईने केल्या १२५ धावा ...

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजी करण्यासाठी आले होते. मात्र या दोघांनाही संघाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. पहिल्याच षटकात ट्रेन्ट बोल्टने मुंबई इंडियन्सला २ मोठे धक्के दिले. सलामीवीर रोहित आणि नमन धीर शून्यावर बाद होऊन माघारी परतले.

त्यानंतर फलंदाजीला आलेला डेवाल्ड ब्रेविस देखील खातं ही न उघडता माघारी परतला. कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माने डाव सांभाळला. दोघांनी मिळून काही महत्वपूर्ण धावा जोडल्या. मात्र हार्दिक पंड्या वैयक्तिक ३४ आणि तिलक वर्मा ३२ धावा करत माघारी परतला. या दोघांना वगळलं तर इतर कुठलाही फलंदाज ३० धावांचा आकडा गाठू शकला नाही. मुंबईला २० षटकअखेर ९ गडी बाद १२५ धावा करता आल्या.

मुंबईचा सलग तिसरा पराभव..

या हंगामात मुंबई इंडियन्सला अजूनही सूर गवसलेला नाही. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला . मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता राजस्थानविरुद्धचा पराभव हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील तिसरा पराभव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT