Maharashtra Politics: NCP च्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार; मंत्री छगन भुजबळांनी दिले सूचक संकेत

Chhagan Bhujbal Comment On NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानं आता नवा ट्विस्ट घेतलाय.राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याचे संकेत मंत्री भुजबळांनी दिलेत.. मात्र पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणावर अनपेक्षित भूमिका घेतलीय.त्यामुळे पुन्हा गूढ वाढलंय.पाहूयात यावरचा रिपोर्ट.
Chhagan Bhujbal Comment On NCP Merger:
Minister Chhagan Bhujbal hints that the final call on NCP merger will be taken by Sunetra Pawar,Saam tv
Published On
Summary
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पुन्हा गूढ वाढले

  • छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांकडे निर्णय जाण्याचे संकेत दिले

  • अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा वेगात

अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली.. दोन्ही राष्ट्रवादीकडून दावे प्रतिदावे केले गेले. मात्र आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असं म्हणत विलिनीकरणाचे सूचक संकेत दिलेत.

पवारांच्या राष्ट्रवादीकडून सातत्यानं विलिनीकरणाबाबत आग्रही भूमिका मांडली जात होती.मात्र दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाला घाई का? असा सवाल करुन पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली होती.. त्यामुळेच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलिनीकरणाचा विषय आपल्याकडून बंद झाल्याचं म्हटलंय.

त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाचा विषय थांबवल्याचं म्हटलं असलं तरी कुटुंब आणि आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं असेल.. मात्र विलिनीकरणाचा मुहुर्त नेमका कधी ठरणार.याकडे राज्याचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com