MI vs LSG weather update mumbai indians vs lucknow super giants weather report amd2000 saam tv
क्रीडा

MI vs LSG, Weather Update: मुंबई- लखनऊ सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. संपूर्ण हंगामात सुमार कामगिरी केलेला मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संध ठरला होता. तर लखनऊचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्सेस कमी झाले आहेत.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघाने ४ वेळस बाजी मारली आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. हा रेकॉर्ड पाहिला, तर लखनऊचा संघ विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. लखनऊविरुद्ध खेळताना १८२ धावा ही मुंबई इंडियन्स संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.तर १९९ धावा ही लखनऊची मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली सर्वाच्च धावसंख्या आहे.

कशी असेल खेळपट्टी?

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर बाऊन्स असल्याने चेंडू बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळणं सोपं होऊन जातं. तसेच मैदान छोटं असल्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

कसं असेल हवामान?

मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत जोरदार वादळ आलं होतं. त्यामुळे या सामन्यावरही पावसाचं संकट असणार आहे. accueweather ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईतील तापमान २९ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. तर रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे हा सामना रद्द देखील होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT