SRH vs RR Saam tv
Sports

IPL 2024 Winner Prediction: 'मला विश्वास आहे, हाच संघ IPL ट्रॉफी जिंकणार..', CSK च्या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Matthew Hayden IPL 2024 Winner Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याबाबत मॅथ्यू हेडनने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने शानदार खेळ केला आणि राजस्थानला धूळ चारत फायनलचं तिकीट पटकावलं. स्पर्धेतील फायनलचा सामना २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, याबाबत माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने भविष्यवाणी केली आहे.

कोणता संघ उंचावणार आयपीएलची ट्रॉफी

स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना मॅथ्यू हेडन म्हणाला की, ' मला पूर्ण विश्वास आहे, कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकणार. या खेळपट्टीवर सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीची जोडी महत्वाची भूमिका बजावू शकते.'चेन्न्ईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघात सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती हे अनुभवी गोलंदाज आहेत. कोलकाताला अंतिम फेरीत पोहचवण्यात या दोघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमदने राजस्थानच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवलं होतं. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता.

पीटरसननेही सांगितलं कोण मारणार बाजी

या सामन्यातील विजेत्या संघाबाबत बोलताना केवीन पीटरसन म्हणाला की, ' अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादला ज्याप्रकारे पराभूत व्हावं लागलं, ते मला मुळीच आवडलेलं नाही. मला वाटतं की ही गोष्ट त्यांना बॅकफूटवर घेऊन जाईल. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आत्मविश्वास वाढेल, कारण काही दिवसांपूर्वीच या त्यांनी हैदराबादला पराभूत केलं आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी यातून बाहेर निघणं कठीण असणार आहे. मात्र त्यांनी दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे जिंकायचं कसं हे त्यांना चांगलच माहित आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा चिकन-मटण, खाटिक समाज आणि काँग्रेसचे हातात कोंबड्या घेऊन निदर्शन | VIDEO

Early signs of liver cancer: शरीरात 'हे' 6 बदल दिसले तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय; तातडीने डॉक्टरांकडे जा

सिडकोच्या घरांबाबत मोठी बातमी! जम्बो लॉटरी पुन्हा पुढे ढकलली, नागरिकांचा हिरमोड

SCROLL FOR NEXT