Rinku Singh, Rahul Dravid, India vs South Africa T20 series SAAM TV
Sports

Rinku Singh : 'फिनिशर' रिंकू सिंहला मिळाला राहुल द्रविड सरांकडून 'सक्सेस मंत्रा'; स्वतःच सर्व काही सांगून टाकलं!

Rinku Singh, India vs S Africa series Latest Update : भारताचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहला राहुल द्रविड यांनी यशाचा मंत्र दिला. सरावानंतर त्याने स्वतःच याबाबत सर्व काही सांगितले.

Nandkumar Joshi

Rinku Singh, India vs S Africa series :

भारताचा 'फिनिशर' आणि स्फोटक फलंदाज रिंकू सिंह याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गुरूमंत्र दिलाय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेच्या आधीच द्रविड सरांकडून कोणता गुरुमंत्र मिळाला, याचा खुलासा त्यानं स्वतःच केला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर चेंडूला मिळणारी अतिरिक्त उसळी आणि वेग बघता अधिकचे प्रयत्न आणि सराव करण्याची गरज आहे, असे रिंकू म्हणाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघाच्या (Team India) खेळाडूंनी पहिल्याच सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यात रिंकू देखील होता. त्याने दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांबाबत प्रतिक्रिया दिली. मी ज्यावेळी इथे फलंदाजीचा सराव केला, त्यावेळी भारतीय खेळपट्ट्यांच्या तुलनेत चेंडूला अधिक उसळी मिळत होती. वेग अधिक आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजीविरुद्ध अधिक सराव करावा लागेल, असे तो म्हणाला.

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना रविवारी होणार आहे. रिंकू सिंह हा पाचव्या किंवा सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी येऊ शकतो. राहुल द्रविडने मला नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे, असे रिंकूने सांगितले.

बीसीसीआय टीव्हीशी बोलताना रिंकू म्हणाला की, ''सराव करताना मजा आली. इथलं वातावरण खूप छान होतं. राहुल द्रविड सरांसोबत खेळण्याची संधी मिळणे हा सुखद अनुभव होता. नैसर्गिक खेळ करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेव असे राहुल सरांनी मला सांगितले.''

२०१३ पासून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यातूनच मला भारतासाठी खेळताना आत्मविश्वास मिळाला, असे रिंकूने सांगितले.

२०१३ पासून उत्तर प्रदेशसाठी खेळताना पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. आता मला त्याची सवय झाली आहे. चार - पाच विकेट बाद झाल्यानंतर फलंदाजी करणे कठीण असते. पण स्वतःवर विश्वास आहे. जितका संयमाने खेळणार, तितकीच उत्तम कामगिरी करू शकतो, असेही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT