सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा चर्चेत असण्याचं मुख्य कारण म्हणजे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद. इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गौतम गंभीर आणि एस श्रीसंत या दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.
मैदानात झालेला वाद सोशल मीडियावरही पोहोचला. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान या प्रकरणात आता माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमारने देखील उडी घेतली आहे.
श्रीसंत- गंभीर वादात प्रवीण कुमारची उडी..
प्रवीण कुमारने या प्रकरणाला हवा देऊ नका असं आव्हान केलं आहे. तो म्हणाला की,'हा खेळाचा एक भाग आहे. ही प्रकरणं उचलून धरायची गरज नाही. हा वाद मैदानापूर्ती मर्यादीत असावा, त्यापुढे हा वाद जायला नको. लोकांनी कारण नसताना सोशल मीडियावर हे प्रकरण उचलून धरलं आहे. ते दोघंही येत्या काही दिवसात विसरुन पुढे जातील.'
तसेच तो पुढे म्हणाला की,'खेळाडू मैदानाबाहेर पडताच सर्वकाही ठीक होऊन जातं. त्या दोघांमध्ये कुठलंही वैर नाही. माध्यमात भर घालून सांगितलं जात आहे. हा वाद झाल्यानंतर श्रीसंतने दोन व्हिडिओ शेअर केले. पहिल्या व्हिडिओमध्ये तो गंभीरविरुद्ध झालेल्या वादाबाबत बोलताना दिसून आला. दरम्यान दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याने गंभीर नेमकं काय बोलला होता. श्रीसंतने व्हिडिओ शेअर केल्यानंतर गंभीरने देखील पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest sports updates)
काय म्हणाला श्रीसंथ?
श्रीसंतने एक व्हिडिओ शेअर करत गंभीर वाद सुरु असताना काय म्हणाला याबाबत खुलासा केला. तो म्हणाला की, 'मैदानात गंभीर मला फिक्सर-फिक्सर असं म्हणत होता.अंपायरसमोरही तो मला फिक्सर म्हणत गोलंदाजी करायला जा असं म्हणत होता. मी तिथून निघून गेलो तरी तो तोच शब्द वापरत राहिला. मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द वापरला नाही. तो अनेकांशी असाच वागतोय. गौतम गंभीरकडे भरपूर पैसा आहे आणि त्याचा पीआरही खूप मजबूत आहे.' यावर गंभीरने पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्याने 'जेव्हा जगाचे लक्ष स्वत:कडे वेधायचे असते तेव्हा ते हसू.'असं लिहीलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.