IND vs SA: पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! या खेळाडूंना बसावं लागेल बाहेर

India vs South Africa Playing 11 Prediction: भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे
team india
team indiasaam tv news
Published On

Team India Playing XI Prediction:

भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडणं हे सूर्यकुमार यादवसाठी सोपं मुळीच नसणार आहे. नुकताच भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तर आगामी मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना देखील स्थान दिलं गेलं आहे

सलामी जोडी..

या सामन्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. ही जोडी सुरुवातीच्या ६ षटकात तुफान फटकेबाजी करुन संघाच्या धावसंख्येत वेगाने भर घालू शकते. यशस्वी जयस्वालने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत १३८ धावा केल्या होत्या. तर ऋतुराज गायकवाडने २२३ धावा कुटल्या होत्या.

मध्यक्रम..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.

आक्रमक फलंदाज रिंकू सिंग या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. या सामन्यासाठी जितेश शर्माची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली जाऊ शकते. जर भारतीय संघ या प्लेइंग ११ सह मैदानात उतरला तर, शुभमन गिल, ईशान किशन आणि तिलक वर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

team india
India vs South Africa, Weather Update: IND vs SA यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द होणार? समोर आलं मोठं कारण

अष्टपैलू खेळाडू..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाला संधी मिळणं निश्चित आहे. या मालिकेसाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावं लागेल.

गोलंदाज..

फिरकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोईला या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. असं झाल्यास कुलदीप यादवला प्लेइंग ११ मधून बाहेर राहावं लागेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दिपक चाहर यांना संधी दिली जाऊ शकते.

team india
IND VS SA: द.आफ्रिका दौऱ्यावर या ३ खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण

पहिल्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com