ह्रदयस्पर्शी! बाळासाठी आपलं 'Olympic Medal' विकलं; नंतर मिळालं 'हे' रिटर्न गिफ्ट Facebook/@Maria Magdalena Andrejczyk
Sports

ह्रदयस्पर्शी! बाळासाठी आपलं 'Olympic Medal' विकलं; नंतर मिळालं 'हे' रिटर्न गिफ्ट

पोलंडच्या मारिया आंद्रेजीक या महिला खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं. मात्र रौप्यपदक जिंकल्याच्या काही दिवसांनंतरच मारियाने आपलं रौप्यपदक चक्क लिलावात काढलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भारताच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलं तर पोलंडच्या मारिया आंद्रेजीक (maria andrejczyk) या महिला खेळाडूने रौप्यपदक जिंकलं. मात्र रौप्यपदक जिंकल्याच्या काही दिवसांनंतरच मारियाने आपलं ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं रौप्यपदक चक्क लिलावात काढलं. (medal auction) या पदकाची विक्री करुन तिला सुमारे १ लाख ९० हजार डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये १ कोटी ४१ लाख ४० हजार रुपये इतकी प्रचंड किंमत मिळाली. त्यानंतर जगभरात या खेळाडूची चर्चा झाली. आपलं ऑलिम्पिक मेडल विकण्याची एवढी काय गरज निर्माण झाली असा प्रश्न जगाला पडला होता. याचं उत्तर आता मिळालं आहे. (maria andrejczyk Sold own Olympic Medal for the baby)

हे देखील पहा -

त्याचं झालं असं की, मिलोसझेक माल्यसा नावाच्या एका लहान बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रीया करण्यासाठी मारियाला पैसे गोळा करायचे होते. या बाळाला अमेरिकेमध्ये जाऊन उपचार घेता यावेत म्हणून आपलं तिने पदकच लिलावात काढलं. विशेष म्हणजे या बाळाशी तिचा काहीही संबंध नाही, मात्र एका अनोळखी बाळाचा जीव वाचवण्यासाठी तिने चक्क ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं आपलं रौप्यपदकच विकुन टाकलं. यासंदर्भात तिने फेसबुकवर माहिती दिली आहे.

नंतर मिळालं रिटर्न गिफ्ट

मारियाची ही बातमी तिच्या देशात वाऱ्यासारखी पसरली. सर्वांकडून तिच्या या दानशूर स्वभवाचे कौतुक झाले. पण तिला याचं रिटर्न गिफ्टही मिळालं ते म्हणजे तिच्याच पदकाच्या स्वरुपात. पोलंडमधील झाबका या उद्योग समुहाने (Żabka Polska) तिचं पदक विकत घेण्याचं ठरवलं. सोबतच तिला आवश्यक असणारी रक्कम आणि या बाळाच्या उपाचारांचा पुढील सर्व खर्च कंपनी करेल असं झाबकाने जाहीर केलं. याशिवाय कंपनीने तिला आणखी एक सप्राईज दिलं, ते म्हणजे तिने लिम्पिकमध्ये जिंकलेलं रौप्यपदक. झाबाका कंपनाने मारियाचं पदक विकत घेतलं आणि पुन्हा तिलाच रिटर्न गिफ्ट म्हणून तिचं पदक तिला परत देण्यात आलं. त्याचप्रमाणे हे पदक तुझ्याकडेच ठेव आम्ही बाळाला लागेल ती सर्व आर्थिक मदत करु असं तिला सांगण्यात आलं.

मारियाच्या दानशूर वृत्तीने आणि या सुंदर निर्णयाने आम्ही फार प्रभावित झालो आहोत. आम्हाला तिचा अभिमान आहे आणि तिच्या या कामात आम्ही योगदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे, असं झाबका या उद्याेग समुहाने म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT