नागपूर - ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राच्य Niraj Chopra नावाने यापुढे पुण्यातील Pune आर्मी स्टेडियम Army Stadium ओळखले जाणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह Rajnath Singh यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिले जाणार आहे. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये Tokyo Olympics पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा यावेळी सत्कार देखील करण्यात येणार आहे.
हे देखील पहा -
संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोमवारी सकाळी पुण्यात येणार आहेत. ते आधी लष्कराच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आर्मी स्टेडीयमचा नामकरण सोहळा होणार आहे.
नीरज चोप्राने या भारतीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तब्बल १३ वर्षानंतर, म्हणजे २००८ बीजिंग ऑलिम्पिकनंतरचे हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यामुळे आता यापुढे पुण्यातील आर्मी स्टेडियम ओळखले जाणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.