RR vs LSG Highlights Saam TV
क्रीडा

RR vs LSG Highlights: मार्कस स्टॉयनिसने सामना फिरवला; लखनौचा राजस्थानवर १० धावांनी विजय

Satish Daud

RR vs LSG 2023 Jaipur Scorecard : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा २६ वा सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सवर १० धावांनी विजय मिळवला. लखनौचा यंदाच्या हंगामातील चौथा विजय असून राजस्थानचा दुसरा पराभव आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौ सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ७ बाद १५४ धावा केल्या. लखनौकडून काईल मेयर्सने सर्वाधिक ५१ धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुललने ३९ धावांची खेळी केली. (Latest Sports News)

याशिवाय निकोलस पूरनने २९ तर स्टॉयनिसने २१ धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन आश्विनने २ विकेट्स, तर बोल्ट, संदीप शर्मा आणि होल्डरने प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या. दरम्यान, १५५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने सावध सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी पहिल्या विकेट्साठी ८७ धावा जोडल्या.

हा सामना राजस्थान सहज जिंकेल असं वाटत असताना स्टॉयनिसने सामना लखनौच्या दिशेने फिरवला. त्याने आधी जैसवाल आणि त्यानंतर बटलरला बाद केलं. जैस्वालने ४४ तर बटलने ४० धावांची खेळी केली. या दोघांपाठोपाठ कर्णधार संजू सॅमसन २ धावा आणि शिमरन हेटमायर २ धावा काढून झटपट माघारी परतले.

राजस्थानचा संघ अडचणीत सापडला असताना देवदत्त पडिकल मैदानावर आला. त्याने २१ चेंडूत झटपट २६ धावांची खेळी केली. त्याला रियान परागने सुद्धा चांगली साथ दिली. मात्र शेवटच्या षटकात राजस्थानला १९ धावांची गरज असताना आवेश खानने सामना फिरवला. त्याने आधी देवदत्त पडिकलला आणि त्यानंतर धृव जुरेलला बाद केलं. अखेर राजस्थाननचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १४४ धावाच काढू शकला. लखनौकडून आवेश खान आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौने पावर प्लेमध्ये सावध फलंदाजी केली. पहिल्या ५ षटकांत लखनौला फक्त ३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, मैदानात जम बसल्यानंतर केएल राहुल आणि कायल मेयर्स यांनी नंतर आक्रमक फटकेबाजी करत धावांची गती वाढवण्यास सुरूवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ८३ धावा जोडल्या.

ही जोडी आज शतकी सलामी देणार असे वाटत असतानाच होल्डरने राहुलला बाद केलं. केएल राहुल ३९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आयुष बदोनीला बोल्टने १ धावा तर दीपक हुड्डला अश्विनने २ धावांवर बाद करत लखनौची अवस्था बिनबाद ८२ वरून ३ बाद ९९ अशी केली. अखेर अर्धशतक ठोकणाऱ्या मेयर्सने लखनौला शंभरी पार करून दिली. मात्र अश्विनने मेयर्सचा ५१ धावांवर त्रिफळा उडवत लखनौचा सेट फलंदाज माघारी धाडला.

अर्धशतक ठोकणारा मेयर्स बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिसने पाचव्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. २० व्या षटकात संदीप शर्माने स्टॉयनिसला २१ धावांवर बाद केले. पाठोपाठ निकोलस पूरन देखील २० चेंडूत २८ धावा करत माघारी परतला. अखेर लखनौने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली. (Maharashtra Breaking News)

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT