Delhi Capitals IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंवर मोठं संकट; मॅचच्या आधीच झाली महागड्या वस्तूंची चोरी

Delhi Capitals Team: एकीकडे पराभव दिल्लीची पाठ सोडत नसताना दुसरीकडे खेळाडूंवर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे.
Delhi Capitals Players Bat Kit Stolen
Delhi Capitals Players Bat Kit StolenSaam TV
Published On

Delhi Capitals Players Bat Kit Stolen: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या १६ वा हंगाम जोमात सुरू आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडून जवळपास सर्वच संघांनी प्रभावी कामगिरी केली आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या कर्णधारपदाची कमान सांभाळलेल्या डेव्हिड वॉर्नरला आतापर्यंत संघाला एकही विजय मिळवून देता आला नाही. (Latest Sports News)

यंदाच्या हंगामात दिल्लीने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यातील सर्वच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. एकीकडे पराभव दिल्लीची पाठ सोडत नसताना दुसरीकडे खेळाडूंवर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे.

Delhi Capitals Players Bat Kit Stolen
Mohammed Siraj : IPL २०२३ वर फिक्सिंगचं सावट; मोहम्मद सिराजची बीसीसीआयच्या ACU ला धक्कादायक माहिती

दिल्ली कॅपिटल्सच्या खेम्यात चोरी (Theft) झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. एका क्रिडावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा विमानातून दिल्लीला येत होता. दिल्लीत आल्यानंतर खेळाडूंनी त्यांच्या किटबॅग तपासल्या असता त्यांच्याकडून या सर्व वस्तू गायब होत्या.

रिपोर्टनुसार, हरवलेल्या बॅटपैकी ३ बॅट डेव्हिड वॉर्नरच्या, ३ फिल सॉल्टच्या, दोन मिचेल मार्शच्या आणि ५ बॅट यश धुलच्या असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर क्रिकेट किटमधून इतर खेळाडूंचे हातमोजे, शूज आदी सामानही गायब झाल्याची माहिती आहे. विदेशी खेळाडूंच्या या महागड्या वस्तूंची किंमत सुमारे १ लाख इतकी होती. (Breaking Marathi News)

खेळाडूंना चोरी झाल्याचे कधी समजले

ज्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी आपापल्या खोलीत जाऊन किट बॅग गोळा केल्या, त्याच दिवशी खेळाडूंना ही चोरी झाल्याचे समजले. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या किट बॅगमधून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर फ्रँचायझी अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली.

Delhi Capitals Players Bat Kit Stolen
Arjun Tendulkar Last Over: शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने फिरवला गेम! दिग्गजांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी दिल्ली कॅपिटल्सनेही तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एका सूत्राने सांगितले की, 'प्रत्येकाच्या किट बॅगमधून काहीतरी गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला.

अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळावर उचलून धरण्यात आले. तपास सध्या सुरू आहे. तथापि, दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये त्यांचा पुढील सामना गुरूवार, २० एप्रिल रोजी दिल्लीत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com