rohit sharma google
Sports

Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून रिटायर करण्याचा प्लान; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

Manoj Tiwari On Rohit Sharma Retirement: कसोटी आणि T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंर रोहित शर्माला वनडे क्रिकेटमदून देखील बाहेर काढण्याचा प्लॅन केला जातोय, असा खळबळजनक दावा भारतीय संघातील माजी खेळाडूने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय कसोटी आणि T20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे. वृत्तानुसार, रोहित शर्मा हा २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप पर्यंत खेळू इच्छितो, परंतु हे त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर अवलंबून असेल. रोहित शर्मा आता ३८ वर्षाचा आहे. एकीकडे रोहित शर्माच्या फिटनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे बीसीसीआयने खेळांडूसाठी ब्रोंको टेस्ट सुरु केली आहे. ही चाचणी खेळांडूमध्ये हाय लेव्हल ची फिटनेस राखण्यासाठी आणि ऐरोबिक क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने रोहित शर्माच्या निवृत्तीवर मोठे विधान केले आहे.

मनोज तिवारीचा खळबळजनक दावा

२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा निवृत्त व्हावा यासाठीच ब्रोंको चाचणी सुरु करण्यात आली आहे, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने केले आहे. रोहितची फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. तो फिट नसला तरी तो बॅटने सर्वोत्तम गोलंदाजाना षटकार मारु शकतो. त्यामुळे अयोग्य असूनही त्याला बेंचवर बसवणे संघासाठी कठीण आहे. आणि म्हणूनच ब्रोंको टेस्ट सुरु करण्यात आली आहे, असे मत मनोज तिवारीने मांडले.

ब्रोंको टेस्ट ही रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी आहे...

क्रिकट्रॅकरच्या एका इंटरव्हयूमध्ये मनोज तिवारी म्हणाला की, २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या प्लॅनिंगमधून विराट कोहलीला बाहेर ठेवणे कठीण वाटते, परंतु रोहित शर्माला या नियोजनात सामील करतीय याची मला शंका आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करतो, काही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आलेली फिटनेस ब्रोंको टेस्ट ही रोहित शर्मा सारख्या खेळांडूसाठीच आहे ज्यांना बीसीसीआय भविष्यात संघात सामील करु इच्छित नाही.

रोहित शर्माला ब्रोंको टेस्टमध्ये रोखले जाईल का?

मनोज तिवारी पुढे म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झालेली ब्रोंको चाचणी ही सर्वात कठीण फिटनेस चाचण्यांपैकी एक आहे, प्रश्न असा आहे की आता का? जेव्हा नवीन मुख्य प्रशिक्षकाला पहिल्याच मालिकेपासून हे काम मिळाले, तेव्हा का नाही? ते कोणी सुरू केले आणि कोणाची कल्पना आहे? ब्रोंको चाचणी लागू करण्यामागे कोण आहे? माझ्याकडे याचे उत्तर नाही, परंतु असे दिसते की जर रोहित शर्माने त्याच्या फिटनेसवर कठोर मेहनत केली नाही तर त्याला संगात स्थान मिळवणे कठीण होईल. माझ्या मते, त्याला ब्रोंको चाचणीत रोखले जाईल."

खेळांडूच्या फिटनेस लेव्हलसाठी ब्रोंको टेस्ट महत्वाची

मनोज तिवारी पुढे म्हणाला की, "ही चाचणी सर्वोच्च पातळीवर फिटनेस लेव्हल निश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे, परंतु मला वाटते की काही खेळाडूंना बाहेर ठेवण्यासाठी देखील ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे २०११ मध्ये जेव्हा सेहवाग, युवराज, गंभीर आणि इतर खेळाडू चांगली कामगिरी करत होते आणि २०११ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर यो-यो चाचणी सुरू करण्यात आली. तेव्हा देखील असेच घडले होते. यामागे अनेक गोष्टी आहेत. भविष्यात काय होते ते पाहावे लागेल.

ब्रोंको टेस्ट सुरु करण्याच्या वेळेवर मनोज तिवारीचा आक्षेप

मनोज तिवारी यांनी ब्रोंको टेस्ट सुरू करण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गौतम गंभीर गेल्या वर्षी जुलैमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते, त्यानंतर आता ब्रोंको टेस्ट सुरू करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नवीन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स जूनमध्ये संघात सामील झाले आणि त्यानंतर ही फिटनेस टेस्ट सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhogwe Beach : गणपतीला कोकणात गेलाय, भोगवे समुद्र किनाऱ्यावर मारा फेरफटका

Maharashtra Live News Update: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर पोलीस बंदोबस्त

BJP Leader: 'आता मृत्यूशिवाय पर्याय नाही...; भाजप नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण, काय आहे कारण?

Surya Gochar: पुढील महिन्याचा दुसरा आठवडा ठरेल महत्त्वाचा; तीन राशींचे चमकणार नशीब, पोहोचतील यशाच्या शिखरावर

Maratha Aarakshan: चिवडा, चटणी, चकली, भाकरी...मराठा आरक्षण आंदोलकांसाठी घराघरात तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT