Manika Batra Saam Tv
Sports

Manika Batra: मनिका बत्राचे आरोप सिद्ध, प्रशिक्षक सौम्यदीप रॉय मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, महासंघाचे झाले निलंबन

25व्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेतील सांघिक संघात (Asian Table Tennis Team Championships) मनिकाची निवड झाली नाही. मनिका बत्राने न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या कार्यकारी समितीस सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. तसेच या फेडरेशनवर एका आठवड्यात प्रशासकाची नियुक्ती केली जाईल असे न्यायालयानं स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांनी मार्चमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये गुंतल्याचे न्यायालयास (Delhi High Court) आढळून आले आहे. (manika batra latest marathi news)

टेबल टेनिसपटू (table tennis) मनिका बत्रा (Manika Batra) हिने गतवर्षी सप्टेंबरमध्ये दावा दाखल केली होता आणि प्रशिक्षक रॉय यांनी तिला सामना हरायचा असं सांगितल्याचा आरोप केला होता. ज्यामुळं राॅय यांचा विद्यार्थी सितीर्थ मुखर्जीला (Sitirtha Mukherjee) संधी मिळेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानी असलेल्या बत्राने रॉय हिने राॅय हे प्रशिक्षक नकाेत म्हणून म्हटलं ताे. मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्यास सांगणारे कोणीतरी तिच्या बाजूला बसले असते तर ती तिच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकली नसती असा दावा तिने केला हाेता.

टीटीएफआयच्या कारणे दाखवा नोटीसमध्ये मनिका बत्राने टोकियो गेम्सच्या एकेरी स्पर्धेत रॉयची मदत नाकारल्यानंतर तिने खेळाची बदनामी केल्याचे नाकारले होते. मनिकाचे प्रशिक्षक सन्मय परांजपे (Sanmay Paranjape) यांना टोकियोमधील प्रशिक्षण सत्रात प्रवेश देण्यात आला हाेता. परंतु त्यांच्याकडे मैदानात प्रवेश करण्याची मान्यता नव्हती आणि त्यांचे प्रवेशाचे आेळखपत्र नूतनीकरण करावे ही मागणी फेटाळण्यात आली हाेती.

25व्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेतील सांघिक संघात (Asian Table Tennis Team Championships) मनिकाची निवड झाली नाही. त्यामुळे तिने न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Offer: जिओ यूजर्ससाठी खास ऑफर, २% जिओ गोल्ड, अमलिमिटेड 5G डेटा अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

SCROLL FOR NEXT