आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानवपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून वादाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. पाकिस्तानला यजमानपद मिळताच भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर ओपनिंग सोहळ्यात भारताचा झेंडा न लावल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात तिरंगा फडकवल्याने फॅनला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाहोरच्या स्टेडियमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु आहे.
या सामन्यादरम्यान एक फॅन भारताचा तिरंगा फडकवतोय त्यावेळी मैदानात असलेले सेक्युरिटी गार्ड येतात आणि त्याच्याकडून तिरंगा हिसकावून घेतात. त्यानंतर त्याला पकडून खेचत मैदानाबाहेर घेऊन जातात. तिरंगा फडकावणारा नेमका कोणत्या देशाचा नागरिक होता, हे अजूनही कळू शकलेलं नाही.
तर झाले असे की, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फॅन्सने हजेरी लावली होती. यासह तुफान गर्दीत तिरंगाही फडकताना दिसला.
काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक व्यक्ती भारतीय तिरंगा फडकवताना दिसून आला. हे दिसताच सेक्युरिटी गार्डने त्याच्याकडून झेंडा हिसकावून घेतला आणि त्याला धक्काबुक्की करत खाली उतरवलं. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही संतापले आहेत.
व्हायरल व्हिडिओनुसार, सेक्युरिटी गार्ड्स त्याला धक्काबुक्की करताना दिसून येत आहेत. मात्र तिकडे नेमकं काय घडलं. तो नक्की भारतीय होता का? त्याच्याकडून तिरंगा हिसकावून त्याला बाहेर का करण्यात आलं? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.