Katie Volynets in Tennis Action at Mumbai Open saam tv
Sports

L&T Mumbai Open: एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेची तारीख ठरली! केव्हा होणार सुरुवात?

L & T Mumbai Open Match Dates: एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेला केव्हा सुरुवात होणार, याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा 3 फेब्रुवारीपासून रंगणार

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 3 फेब्रुवारी 2025 पासून 1,25,000डॉलर पारितोषिक रकमेच्या एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर पार पाडणाऱ्या या स्पर्धेला सलग तिसऱ्या वर्षी एल अँड टी यांनी पाठिंबा दिला आहे.

स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून मुख्य ड्रॉ चे सामने 3 फेब्रुवारी पासून रंगणार आहेत. स्पर्धेचे अंतिम फेरीचे सामने 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संयोजन समितीचे मुख्य सदस्य आणि आयएएस संजय खंदारे आणि प्रवीण दराडे यांनी स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईतील टेनिस प्रेमींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा रोमांचकारी ठरणार असून सलग चौथ्या वर्षी एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

स्पर्धेच्या गेल्या तीनही मालिकेत रोमांचकारी लढती पहावयास मिळाल्या असून हे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. मुंबई ही स्वप्नांची नगरी असून येथील क्रिडा प्रेमी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी हि स्पर्धा अधिक खास करतात आणि यावर्षी देखील त्याची पुनरावृत्ती नक्कीच पाहायला मिळेल. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर यापूर्वी जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून यंदाच्या वर्षी त्यात आणखी काही मानांकित खेळाडूंची भर पडणार आहे.

डब्लुटीए 1,250000डॉलर दर्जाच्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये जागतिक क्रमवारीत 89व्या स्थानी असलेल्या तात्याना मारिया हीचा समावेश आहे. या स्पर्धेत आपल्या करिकिर्दितील चौथे विजेतेपद मिळवण्याचा ती प्रयत्नात राहणार आहे. याआधी जागतिक क्रमवारीतील 42व्या स्थानी असलेल्या मारिया हीने 2022मध्ये वयाच्या 34व्या वर्षी विंबल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून विक्रमी कामगिरी केली होती. तसेच, तिने कोलंबिया येथे 2023 व 2024मध्ये पार पडलेल्या कोपा कोल्सेनिटास डब्लूटीए 250स्पर्धेत सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावले होते.

मारिया बरोबरच कॅनडाची जागतिक क्र.98व्या स्थानी असलेली रिबेका मेरीनोदेखील सहभागी होणार आहे. याआधी तिने आपल्या कारकीर्दीत जागतिक क्रमवारीतील 38 व्या स्थानी गाठणाऱ्या रिबेका चा गेल्या चार महिन्यांत दुसरे डब्लूटीए स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्याचा प्रयांत असणार आहे. तिने नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेत झालेल्या दाऊ टेनिस क्लासिक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

जागतिक क्रमवारीत 104 व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या नुरिया पेरिझास डियाझ हीने आपल्या कारकीर्दीत तीन डब्लूटीए स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 2016मध्ये खांद्याच्या दुखापती तून सावरल्यानंतर कॅनबेरा डब्लूटीए 125000डॉलर स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना तिने हार्ड कोर्टवर काही अनपेक्षित निकाल नोंदवले आहेत.

गतविजेती लात्वियाची दारजा सेमेनिस्तया जागतिक क्रमवारीत 120 व्या स्थानी असून यंदा विजेतेपद राखण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने गेल्या वर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हीचा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला होता.

विंबल्डन स्पर्धेत मिश्र दुहेरीची अंतिम 2021मध्ये खेळणाऱ्या आणि इंग्लंडमध्ये 2022 व 2024मध्ये बिलीझिनकिंग कप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून देणाऱ्या हॅरीएट डार्ट हीचाही पहिल्या डब्लूटीए स्पर्धेत विजेतेपद पत्कवणायासाठी प्रयत्न राहणार आहे.

सर्वांचे लक्ष लागलेल्या आणि राफेल नदालने त्याच्या अकादमी साठी निवडलेल्या फिलिपिन्स च्या 19 वर्षीय अलेकझांड्रा इयाला हीचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत 138व्या स्थानावर असलेल्या अलेकझांड्रा ने याआधी ज्युनिअर ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीत एक व दुहेरीत दोन विजेतेपद पटकावले आहे. तसेच, क्रोएशियाची माजी ज्युनियर जागतिक क्र.1 पेट्रा मार्सिंको हिच्या कडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

डब्लूटीए स्पर्धा मालिकेत दोन एकेरी व दोन दुहेरी गटातील विजेतेपद पटकावणारी झिल ताईशमन हिच्यासह 9वेळा ग्रँड स्लॅम दुहेरी गटात विजेतेपद पटकावणाऱ्या क्रिस्टिना लाडेनोव्हिकचा देखील आव्हान बिरणमध्ये समावेश आहे.

सहा वर्षांनंतर 2024मध्ये एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेने पुनरागमन केले होते. यामध्ये लत्वियाच्या दारजा सेमेनिस्तया हीने एकेरीत तर, दलिला जाकुपोव्हिक व सब्रीना सांतामारिया यांनी दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. तत्पूर्वी 2017मध्ये सबालेंका हीने, 2018मध्ये लुक्सिका कुमखुम हीने विजेतेपदाचा मान पटकावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT