Kane Williamson LSG 2026 saam tv
Sports

IPL 2026 आधी LSG ची मोठी खेळी, केन विलियम्सनला घेतलं ताफ्यात; दिसणार नव्या भूमिकेत

Kane Williamson LSG 2026: आयपीएल ऑक्शनपूर्वीच काही टीमने आपल्या भविष्यातील रणनीतीवर काम सुरू केलं आहे. याच क्रमात, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) टीमने एक 'मोठी खेळी' खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठीचा मिनी ऑक्शन यावर्षी 13 ते 15 डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे सर्व टीम्सना 15 नोव्हेंबरपर्यंत कोणते खेळाडू retain आणि कोणाला रिलीज करायचं याची यादी BCCI ला देणं बंधनकारक आहे. यामुळे प्रत्येक टीम सध्या आपल्या रणनीती आखण्यात व्यस्त आहे. अशातच लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून एक मोठी बातमी समोर येतेय.

'या' खेळाडूला मोठी जबाबदारी

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन IPL 2026 मध्ये पुन्हा दिसून येणार आहे. पण खेळाडू म्हणून नव्हे तर नव्या भूमिकेत दिसणार आहे. 35 वर्षीय विलियम्सनला लखनऊ सुपर जायंट्सने स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझर म्हणून नियुक्त केलंय. टीमचे माजी मेंटॉर जहीर खान यांनी पद सोडल्यानंतर ही जागा रिक्त होती आणि केनच्या येण्याने टीमला मोठा फायदा होऊ शकतो.

कॉन्ट्रॅक्ट नाकारूनही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एक्टिव्ह

महत्त्वाची बाब म्हणजे केन विलियम्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्याने न्यूझीलंड क्रिकेटचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाकारला होता, जेणेकरून तो जगभरातील लीगमध्येही नियमित खेळू शकेल. दुसरीकडे, इंग्लंडचा कार्ल क्रो याची LSG च्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जस्टिन लॅंगर कायम हेड कोच

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर जस्टिन लँगर हेच पुढील सिझनसाठीही LSG चे हेड कोच राहणार आहेत. केनला टीममध्ये आणण्याचा निर्णय हा RPSG ग्रुपचे चेअरमन आणि LSG चे मालक संजीव गोयनका यांनी वैयक्तिकरित्या घेतला. गोयनकांनी लंडनमध्ये विलियम्सनची भेट घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.

“केनचा शांत स्वभाव आणि नेतृत्व कौशल्य प्रभावी”

संजीव गोयंकांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “केनची रणनीतिक विचारसरणी आणि नेतृत्वामुळे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने अप्रतिम कामगिरी केली. तो उत्कृष्ट खेळाडू, चांगला माणूस आणि प्रेरणादायी कर्णधार आहे. त्याचा शांत स्वभाव आणि खेळाडूंना प्रेरित करण्याची शैली नेहमीच प्रभावी ठरते.”

गोयंका पुढे म्हणाले, “लंडनमध्ये आमची भेट झाल्यानंतर केन, मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर आम्ही सर्व मिळून ठरवलं की तो टीमसाठी सर्वात योग्य पर्याय आहे.”

विलियम्सनचा अनुभव टीमसाठी ठरणार ‘गेम चेंजर’

केन विलियमसनचा खेळ आणि नेतृत्व क्षमता सर्वांना माहितीये. त्याने 105 टेस्ट, 173 वनडे आणि 93 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) कडून खेळला होता. LSG मध्ये त्याला सामाविष्ट करण्याची प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती.

गोयंकांच्या म्हणण्यानुसार, “मी केनसोबत अनेक वेळा चर्चा केली आहे. दरवेळी त्याच्यातील मानवी मूल्यं, नेतृत्व आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवला. तो खेळाडूंना ज्या पद्धतीने मोटिव्हेट करतो ते कौतुकास्पद आहे. आम्हाला एक मजबूत रणनीतिक थिंक टँक बनवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT