IND vs AUS : ऑस्ट्रेलियात जाताच विराटची डरकाळी, एक पोस्ट केली अन् खळबळ उडाली, वाचा किंग नेमकं काय म्हणाला?

Virat Kohli News : ऑस्ट्रेलियात पोहचताच विराट कोहलीनं “Never Give Up” अशी आशयाची पोस्ट करत टीकाकारांना उत्तर दिलं. निवृत्तीच्या अफवांवर विराम देत २०२७ वर्ल्डकपसाठी खेळण्याचे संकेत दिल्याचं चाहत्यांचं मत.
Virat Kohli-Rohit Sharma
Virat Kohli Rohit Sharmax
Published On

Virat Kohli Latest X Post : निवृत्तीच्या चर्चेचं वादळ उठलं सुरू असतानाच किंग विराट कोहली टीम इंडियासोबत विदेश दौऱ्यावर पोहचलाय. ऑस्ट्रेलियात पोहचताच विराट कोहलीनं एक पोस्ट केली अन् सोशल मीडियात खळबळ उडाली. काही लोकांनी विराट कोहलीच्या या पोस्टचा संबंध २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसोबत असल्याचा अंदाज बांधलाय. चाहत्यांच्या मते, विराट कोहलीने फक्त पोस्ट टाकली नाही, तर आपण आगामी वर्ल्डकप खेळणार असल्याचे सूतोवाच केलेय. विराट कोहलीची ही नेमकी पोस्ट आहे तरी काय? त्याचा नेमका अर्थ काय? पाहूयात..

विराट कोहलीची नेमकी पोस्ट आहे तरी काय ?

‘The only time you truly fail, is when you decide to give up.’ खरी अपयशाची वेळ तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हार मानता किंवा सोडून देता.

किंग विराट कोहलीने ही क्रिप्टो पोस्ट करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय. तुम्ही हार मानता किंवा सोडून देता तेव्हाच तुमच्या अपयशाची वेळ येते, असे विराटने स्पष्ट मेसेज याद्वारे दिला. ही पोस्ट करत विराट कोहलीने पुढे काही वर्षे क्रिकेट खेळत राहणार असल्याचे संकेत दिले आहे. २०२७ च्या विश्वचषकासाठी विराट कोहली पूर्ण ताकद लावणार असल्याचा अर्थ काहींनी या पोस्टमधून काढला आहे.

Virat Kohli-Rohit Sharma
Pune : दौंडजवळच्या कला केंद्रात पुन्हा राडा, मनोरंजनासाठी आलेल्या दोन गटात कोयत्याने हाणामारी

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या निवृत्तीच्या अफवा उठल्या आहेत. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्त होणार असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला. अनेक दाव्यानुसार, बीसीसीआयकडून विराट कोहलीला २०२७ च्या विश्वचषकासाठी पाहिले जात नाही. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीने क्रिप्टो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहलीच्या या पोस्टनंतर क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आलेय.

Virat Kohli-Rohit Sharma
High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com