lsg vs kkr playing XI prediction lucknow super giants vs kolkata knight riders playing 11 news amd2000 google
Sports

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

LSG vs KKR, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाला आव्हान देताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाला आव्हान देताना दिसून येणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत केलं. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्स संघाला देखील धूळ चारली आहे. त्यामुळे लखनऊचा संघ पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?

लखनऊ सुपर जायटंस् संघाने आतापर्यंत १० सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. हा संघ १२ गुणासंह तिसऱ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही शानदार कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टोइनिसने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात क्विंटन डी कॉकला खेळण्याची संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या सामन्यात युवा फलंदाज अर्शिन कुलकर्णी डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता.

मयांक यादव कमबॅक करणार?

कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे लखनऊच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये लवकरात लवकर विकेट्स घेणं गरजेचं असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी मयांक यादव उपलब्ध नसणार आहे. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यामुळे नक्कीच लखनऊच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

लखनऊ सुपरजाएंट्सः केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अर्शिन कुलकर्णी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान

कोलकाता नाइट रायडर्सः फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोड़ा, हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT