Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

Marathi Breaking Live Headlines Updates: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा होणार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, राहुल गांधी, सीजेपी आंदोलन, राज्याला मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

भिवंडीत 9 स्वीकृत नगरसेवकांसाठी 37 अर्ज; कोणाच्या गळ्यात पडणार संधी? महासभेकडे लागलं राजकीय वर्तुळाचं लक्ष

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नऊ जागांसाठी 16 ते 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 37 अर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेत एकूण 90 निवडून आलले नगरसेवक असून, त्याच्या 10 टक्के प्रमाणानुसार 9 स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे.

नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पडघा पोलिस ठाण्यात सामूहिक अत्याचार प्रकरणी भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात नरेंद्र पवार यांनी भिवंडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायाधीश एन के कारंडे यांनी फेटाळला आहे. सोमवारी अटकपूर्व जमीन अर्ज निर्णयासाठी ठेवला होता. न्यायालयात यावेळी फक्त तक्रारदार पीडिता न्यायालयात हजर होत्या.

वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

दिघी परिसरातील मॅक्झिन चौक जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे गणपती मंडळाची लोखंडी स्वागत कमान अचानक रस्त्यावर कोसळली. सुदेवाने या कमानीखाली कोणताही वाहन चालक आणि वाटसरू न आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. कमान कोसळल्या नंतर परिसरातील नागरिकांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वतःच लोखंडी कमान बाजूला करण्याचा प्रयत्न करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर स्थानिक नागरिक, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी लोखंडी कमान बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

लाडक्या बहीण योजना बाजूला करणार नाही, त्यासाठी वेगळा निधी: बावनकुळे

सर्व प्राधान्य मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलेत. रस्ता असेल बाजूला करू, योजना असेल बाजूला करू. पहिल प्राधान्य शेतकरी आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. ते आम्ही पूर्ण करू अस महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे म्हणाले.लाडकी बहिण योजना पण बाजूला करणार का असा प्रश्न विचारला असता, लाडकी बहिण योजनेचा निधी वेगळा आहे, चार रस्ते बाजूला करता येतील.व्यक्तिगत बंद करता येत नाही अस महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे म्हणाले.व्यक्तिगत योजना बंद करता येत नाही अस बावनकुळे म्हणाले.

संगमनेर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

मोठ्या कालखंडानंतर आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली.

काही दिवसापासून असलेल्या उकाड्यानंतर पावसाने लावली जोरदार हजेरी.

विद्यानंद बापट आणि आयोजक शांत्यशेखर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी दिली खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

पुणे इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल, पुणे येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार

कार्यक्रमातील ‘मुकुट’ आणि ‘विचार बेड’ या कार्यक्रमांत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप

आरोपीने हिंदू धर्म, धार्मिक परंपरा आणि महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा तक्रारीत दावा

वांद्रे माहीम खाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची घटना

Summary

वांद्रे माहीम खाडीमध्ये तरुणाने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती

घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल

खाडी परिसरात शोधमोहीम सुरू

तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभा

महाराष्ट्रातील सन २०२६-२७ च्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबर २०२६ पासून किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याबाबत ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केली आहे, असे कारखाने १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी गाळप सुरू करू शकतील.

काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानावरून संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या

अमरावती शहरातील गणेडिवाल लेआउट मधील यशोमती ठाकूर यांच्या घरावरून ड्रोनच्या घिरट्या. यशोमती ठाकूर यांची अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.

सिंचन भवनात जलसंपदा मंत्र्यांची बैठक सुरू

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सिंचन भवन समोर आंदोलन सुरू

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर शेतकरी संघटना करणारा आंदोलन

Maharashtra News Live Update: खासदार कल्याण काळे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जालन्यात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आहे. यावेळी पोलिसांनी खासदार कल्याण काळे यांना ताब्यात घेतलं आहे.

बीडमध्ये गाण्याच्या तालावर आमदार सुरेश धस यांचा भन्नाट वर्कआउट

बीडमध्ये आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ते सहकाऱ्यांसोबत गाण्याच्या तालावर उत्साहात विविध व्यायामप्रकार करताना दिसत आहेत. राजकीय दौरे, बैठका आणि जनसंपर्काच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते फिटनेसकडे लक्ष देताना दिसल्याने या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दरम्यान, धस हे सध्या आष्टीतील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावरही जात आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नांदेडच्या दुष्काळी दौऱ्यावर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नांदेडच्या दुष्काळी दौऱ्यावर.

महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासाठी प्रशासनाने महामार्गाच्या बाजूला असलेली शेती पाहण्यासाठी बनवला रस्ता .

प्रशासनाने रस्ता तयार केल्याचे बावनकुळे यांच्या आले लक्षात.

प्रशासनाने तयार केलेल्या रस्त्यावरून न जाता बावनकुळे उतरले थेट दुसऱ्या ठिकाणाहून शेतीच्या बांधावर.

नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदामावर ताव मारल्यानंतर उठली होती टिकेची झोड.

काजू बदामाच्या प्रकारानंतर लोकप्रतिनिधी ताकही पीत आहेत फुंकून.

कोरेगावला दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याला शासनाच्या दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून ते आक्रमक झाले आहेत. पावसाअभावी कोरेगाव परिसरात सोयाबीनसह खरीप पिके पूर्णपणे करपून वाळली असून, हाती आलेली पिके काढणीचा खर्चही निघण्यासारखा राहिलेला नाही. आजूबाजूच्या शेजारच्या तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला असताना, कोरेगाववरच अन्याय का, असा संतप्त सवाल येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJP आंदोलन तीव्र करणार

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP कडून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. १ ऑक्टोबरला आझाद मैदानात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या आंदोलनात CJP सहभागी होणार असून, डाव्या संघटनांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा आणि कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, २ ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे CJP ने दिलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आंदोलनात CJP सहभागी होणार असून, २ ऑक्टोबरला CJP कडून जेल भरो आंदोलनही करण्यात येणार आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसखोरी; हातोडा, पकड, दोरीसह तरुण ताब्यात

विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी २६ सप्टेंबर रोजी पहाटे एका तरुणाने घुसखोरी केल्याची घटना घडली. संबंधित तरुण रात्री ३ वाजता घराच्या गच्चीवर पोहोचला होता. सकाळी सुरक्षारक्षक आणि ड्युटीवरील पोलिसाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे १० मीटर लांबीची दोरी आढळल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे. तसेच घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही बंद केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा तरुण नेमका कोण आहे आणि त्याचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे असल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे. त्यामुळे ‘विद्यार्थी आहे’ या दाव्यापलीकडे जाऊन तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोकणात कुळ कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात कुळ कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हजारो एकर शेतजमिनी परप्रांतीयांनी खरेदी केल्याच्या प्रकरणांची चौकशी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीची घोषणा केली होती.

यानंतर समिती गठित करून चौकशी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या जमीन खरेदी प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याने प्रशासनावर दबाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

SIR विरोधात इंडिया आघाडी वज्रमूठ आवळणार

३० सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. SIR विरोधात रणनीती ठरवण्यासाठी होणाऱ्या या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, पी.सी. चाको आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार

दुष्काळ, नापिकी आणि कर्जामुळे मुला-मुलींच्या लग्नासाठी पैसे उभे करता न आल्याने अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा शेतकरी कुटुंबांना चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेना मदतीसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्न ठरली आहेत, त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

मुंबईत आयकर विभागाने आज सकाळपासून बॉलिवूडशी संबंधित तब्बल १२ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. पॅनोरमा स्टुडिओज या फिल्म प्रोडक्शन बॅनरशी संबंधित ठिकाणांसह निर्माते कुमार मंगत पाठक आणि वाशू भगनानी, अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही या कारवाईत समावेश आहे.

फिल्म प्रोजेक्टच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवल्याच्या संशयातून ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. संशयास्पद परदेशी आर्थिक व्यवहार, टॅक्स चोरी आणि आर्थिक अनियमिततेबाबत आयकर विभागाकडून कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी केली जात आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून, आयकर विभागाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागते, याकडे लक्ष लागले आहे.

दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. मुखेडला ट्रिगर-वन यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सोयाबीनची होळी केली. यावेळी शासनाच्या निर्णयाचा निषेध करत मुखेड तालुक्याचा दुष्काळाच्या ट्रिगर-वन यादीत तातडीने समावेश करण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभेत हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी; एकच हशा पिकला

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात मिश्कील टोलेबाजी रंगली. भाषणादरम्यान हसन मुश्रीफ यांनी, “गोकुळमधून वेळ काढून बंटी पाटील आले, त्याबद्दल त्यांचेही आभार,” असा टोला लगावला. यानंतर सतेज पाटील यांनीही व्यासपीठावरून “आधी तुमचे मिटते काय ते पाहा,” असे म्हणत प्रत्युत्तर दिले. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक फटकेबाजीने सभागृहात एकच हशा पिकला.

निवडणूक आयोगाविरोधात सिंधुदुर्गात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; राजीनाम्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार आणि मतचोरी झाल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महसूलमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; शक्तीपीठ महामार्गाला विरोध 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग कशासाठी, असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

उज्जैनमध्ये शाही मशीद प्रकरणावरून वाद निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.

सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; प्रतिकात्मक ज्ञानेशकुमारांना घातली हातकडी

सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आंदोलन केले. सोलापूर काँग्रेस भवनापासून सुरू झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी विविध फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली. पूनम गेटसमोर प्रतिकात्मक बहुरूपी ज्ञानेशकुमारांना बहुरूपी पोलीस अधिकाऱ्याकडून हातकडी घालून निषेध नोंदवण्यात आला.

सरकारने काढलेल्या दुष्काळाच्या शासन आदेशाची ठाकरे गटाकडून  होळी

राज्य सरकारने घोषित केलेली दुष्काळी घोषणा ही फसवी असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शासन आदेशाच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब तहसील कार्यालयासमोर आदेशाची जाहीर होळी करण्यात आली. यावेळी लबाडांचे आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, फसव्या जीआरचा धिकार असो अशा घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात करण्यात येत आहे आंदोलन..

ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक डमी व्यक्ती उभा करत त्याला काढायला लावल्या उठाबशा..

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात करण्यात येत आहे आंदोलन.. ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक डमी व्यक्ती उभा करत त्याला काढायला लावल्या उठाबशा..वर्धा भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपकडून पत्रकार परिषद आयोजित

- गृहराज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची पत्रकार परिषद

- माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नेते उपस्थित

- तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड झाल्याचा डॉ. पंकज भोयर यांचा दावा

- निवडणूक आयोग, SIR प्रक्रिया आणि मतदार याद्यांबाबत राहुल गांधींकडून करण्यात आलेल्या आरोपांवर भोयर यांचे स्पष्टीकरण

- SIRसह सर्व प्रक्रिया एकसमान पद्धतीने सुरू असल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे भोयर यांचे म्हणणे

- निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत जाणीवपूर्वक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

- राहुल गांधी संविधान हातात घेऊन घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित करत असल्याची भोयर यांची टीका

- काँग्रेसकडून EVMबाबत करण्यात आलेल्या आरोपांचाही पत्रकार परिषदेत उल्लेख

- सर्वोच्च न्यायालयाने EVMसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली असूनही त्यावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे भोयर म्हणाले

- निवडणूक आयोगाने EVM हॅक करण्याचे आव्हान दिले होते; मात्र ते सिद्ध करण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याचा दावा

- वर्धा जिल्ह्यात SIR प्रक्रिया सुरू; सर्व राजकीय पक्षांना BLA-1 आणि BLA-2 नियुक्त करण्याची संधी उपलब्ध असल्याचे भोयर यांचे आवाहन

- जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून राजकीय पक्षांनी किती BLA-1 आणि BLA-2 नियुक्त केले, याची अधिकृत माहिती घ्यावी, असे पत्रकारांना आवाहन

- मतदार याद्यांच्या शुद्धीकरण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे भोयर यांचे आवाहन

- केवळ आरोप-प्रत्यारोप न करता मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन

- 2004 नंतर मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी व्यापक प्रक्रिया राबवली जात असल्याचे भोयर यांनी सांगितले

- पश्चिम बंगालमधील काही मतदारसंघांमध्ये SIRनंतर मतदारसंख्येत घट झाल्याचा उल्लेख; या प्रक्रियेबाबत राजकीय दावे वस्तुस्थितीच्या कसोटीवर तपासण्याची गरज असल्याचे मत

- “संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी उपलब्ध यंत्रणेचा वापर करून मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक” — डॉ. पंकज भोयर

- महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेबाबतही विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर भोयर यांनी भूमिका मांडली.

* मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी साहिल वाकोडेच्या पालकांना पोलिसांकडून परवानगी

* विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन

* आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून काही अटी व शर्ती लागू

* आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आंदोलकांवर

* आंदोलनस्थळी शांतता व शिस्त राखण्याचे पोलिसांचे निर्देश

* वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना

* पोलिसांनी दिलेल्या परवानगीतील सर्व अटींचे पालन करणे आयोजकांना बंधनकारक

* नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

* आझाद मैदान परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार

* आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी

बीड जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पिकांची राख रांगोळी शेतकऱ्यांच्या पदरात निराशा

राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे दुष्काळ जाहीर होऊन काही दिवस झाले आहेत शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन कपाशी या पिकांची लागवड केली होती या पिकांची आता राख रांगोळी झाली आहे पावसाने पाठ फिरवली आहे यामुळे शेतकरी आता पुरताच अडचणीत आला आहे लेकरा बाळांचे शिक्षण घर खर्च त्याचबरोबर गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आता हतबल झाला आहे दुष्काळ जाहीर केलाय मात्र आम्हाला मदत कधी मिळणार अशी मोठी चिंता शेतकऱ्यांपुढे उभी टाकली आहे

बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

पालघरच्या बोईसरमध्ये एका ४० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.विजय बेंद्रे अस हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. ओसवाल एम्पायर परिसरातील शिवम अपार्टमेंटमधील एका दुकानासमोर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.बोईसरच्या साईलीला हॉस्पिटलसमोर ही घटना घडली .विजय बेंद्रे हे वेठबिगार म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

* नाशिकमध्ये मराठा समाजाचे आंदोलन

* आरक्षण उपवर्गीकरण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

* विखे पाटील यांच्या कार्यालयासमोरच जागरण-गोंधळ आंदोलन

* एसीबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने भक्कम बाजू मांडावी, मागणी

* सारथी संस्थेला तातडीने 1 हजार कोटींचा निधी देण्याची मागणी

* अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळालाही 1 हजार कोटींचा निधी द्यावा

* विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून आंदोलन

Mumbai: गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची कथित तस्करी, कुर्ल्यात मोठी कारवाई

मुंबई -

- गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची कथित तस्करी, कुर्ल्यात मोठी कारवाई

- सात पिंजऱ्यांमध्ये तब्बल २,१०० पक्षी कोंबून आणल्याचा दावा*

- पक्ष्यांना पुरेशी हवा, पाणी आणि खाद्य नसल्याचा पेटाचा आरोप*

- सीएसएमटी स्थानकात पहाटे २.१५ वाजता पक्ष्यांची पाहणी*

- पेटा, पशुवैद्यकीय अधिकारी, जीआरपी आणि आरपीएफकडून संयुक्त पाहणी*

- पिंजऱ्यांमध्ये काही पक्षी मृत, तर काही गंभीर अवस्थेत आढळल्याचा दावा*

- पक्ष्यांना तातडीने ताब्यात घेण्याची मागणी; मात्र कारवाईला विलंब झाल्याचा आरोप*

Mumbai: दुष्काळ निवारणाच्या तरतुदींसाठी फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर

मुंबई -

दुष्काळ निवारणाच्या तरतुदींसाठी फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर

मंत्री मंडळ उपसमितीची उद्या बैठक

उद्या सायंकाळी 5 वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

10 कॅबिनेट मंत्री व मुख्य सचिव बैठकीत राहणार उपस्थित

Amravati: अमरावती जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

अमरावती-

सततची नापिकी व दुष्काळामुळे अमरावती जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील धक्कादायक घटना

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून ५२ वर्षीय गजानन अलोने या शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना.

कुटुंबावर विविध बँकांचे कर्ज असल्याचे समोर.बँक ऑफ महाराष्ट्र,चिंचोली शाखेचे सुमारे १ लाख ४० हजार रुपये कर्ज, तसेच गृहकर्ज असल्याची माहिती.

कुटुंबाची सामूहिक शेती अवघी दीड एकर,मात्र कर्जाचा बोजा मोठा.

Vasai: वसई पूर्वेकडील भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडला रविवारी मध्यरात्री भीषण आग

वसई -

वसई पूर्वेकडील भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.

डंपिंग ग्राउंडमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोढ पसरले होते

आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाची चार वाहने आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आले होते.

Mumbai: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मुंबई -

IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या 10 सदस्यीय समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली आहे.

चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याची माहिती समितीच्या सूत्रांनी दिली.

संस्थेच्या Board of Governors ने समितीची मुदतवाढीची मागणी मान्य केल्याची माहिती आहे.

चौकशीचा आराखडा समितीने संस्थेच्या प्रशासनाकडे सादर केला आहे.

एका आठवड्यात संपूर्ण चौकशी पूर्ण करणे शक्य नसल्याने आणखी 8 आठवड्यांचा कालावधी मागण्यात आला.

Pune: पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, घाट परिसरात 'यलो अलर्ट

पुणे -

पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, घाट परिसरात 'यलो अलर्ट

सोमवार आणि मंगळवारी पुण्यासह घाट परिसर, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने या भागांना भारतीय हवामानशास्त्र विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पुढील दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळणार आहे..

Mumbai:  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे करणार दौरा

मुंबई -

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे करणार दौरा

मंत्री राणेंचा आज छत्रपती संभाजीनगर-जालना दौरा

नुकसानग्रस्त मच्छीमार आणि तलावांची मंत्री नितेश राणे करणार पाहणी

कन्नडच्या शिवणटाकळी तलावाची पाहणी करून

बदनापूरच्या राजेवाडी आणि सोमाठणा तलावालाही भेट देणार

मच्छीमारांशी संवाद साधून नुकसानीचा घेणार आढावा

Sindhudurg: सिंधुदुर्गात गुलाबी थंडीच्या आगमनाचे संकेत, जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुके

सिंधुदुर्ग -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुके आणि थंडी पडल्याचे दिसून आले.

मागील 30 ते 35 दिवस पाऊस गायब असून कालपासून सकाळच्या सत्रात दाट धुके पडल्याचे पाहायला मिळाले.

तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीही पडल्याचे दिसून आले. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पावसाची “एक्झिट” आणि गुलाबी थंडीच्या आगमनाचे संकेत दिसू लागले आहेत.

कोकणात ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीचे आगमन होते.

Mumbai: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई -

शिवाजी पार्कमधील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

काँग्रेस जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली.

2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या 2013 च्या आदेशाचा दाखला देत पोलिसांनी परवानगी नाकारली.

महाराष्ट्र शासनाच्या 2016 च्या आदेशानुसारही शिवाजी पार्क मैदानाचा वापर इतर प्रयोजनांसाठी करता येत नसल्याचे पत्रात नमूद.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि रुग्णवाहिका वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे.

Nagpur: नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयातील सैर 25 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे

नागपूर

- नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयातील सैर 25 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे

- आठ वर्षानंतर ही दरवाढ करण्यात येणार असून नव्या कंत्राटदाराला कंत्राट दिले जाणार आहे

- सध्या प्रतिव्यक्ती 40 रुपये तिकीट असून ती दरवाढीनंतर 50 रुपये होण्याची शक्यता

- तर लहान मुलांचे तिकीट 20 रुपयांवरून 25 रुपये होणार

- शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत कायम राहणार

Nagpur: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची वार्षिक बैठक इंदूर येथे ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे

नागपूर -

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची वार्षिक बैठक इंदूर येथे ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे

- संघाच्या संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह देशभरातील संघाच्या ४६ प्रांतांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

- संघाच्या शताब्दी वर्षाच्या अंतिम टप्प्यात ही बैठक होत आहे, ऑक्टोबर २०२५ मध्ये संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती

- या बैठकीत शताब्दीवर्ष दरम्यान देशभर राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि मोहिमांचा आढावा घेतला जाणार आहे

Pune: पुण्यात आज काँग्रेसचा व्होट चोरीविरोधात एल्गार

पुणे-

पुण्यात आज काँग्रेसचा व्होट चोरीविरोधात एल्गार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन माफीचा साक्षीदार व्हावे या मागणीसाठी आंदोलन

पुणे शहर काँग्रेस करणार सकाळी १० वाजता आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

Pune: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

पुणे -

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट

सध्या चारही धरणांत २७.८५ टीएमसी म्हणजे ९५.५५ टक्के पाणीसाठा

गतवर्षी याच कालावधीत २९.०६ टीएमसी म्हणजे ९९.६९ टक्के पाणीसाठा

पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता पुढील दहा महिन्यांचे पाणी नियोजन आवश्यक

Nanded: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

नांदेड -

मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून मोबाईल शॉपी चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील घटना.

मोबाईल शॉपी चालक प्रवीण दाचावार आणि त्यांच्या भावाला जब्बर मारहाण.

मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद.

दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानी मिळून दाचावार बंधूंना मारहाण केल्याने दोन्ही भाऊ गंभीर जखमी.

आरोपी विरोधात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Pune: पुणे मेट्रोने गणेशोत्सवात 48 लाख, तर विसर्जनाच्या दिवशी विक्रमी प्रवासी

पुणे -

पुणे मेट्रोने गणेशोत्सवात 48 लाख, तर विसर्जनाच्या दिवशी विक्रमी प्रवासी

गणेशोत्सवातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांनी यंदाही मेट्रोला मोठी पसंती दिली.

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यानच्या १२ दिवसांत पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर ४८ लाख ३२ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने २४ तासांत पाच लाख ८० हजार प्रवाशांची वाहतूक केली.

या कालावधीत मेट्रोला प्रवासी भाड्यातून सात कोटी ४९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Pune: विश्रांतवाडीमध्ये 11 वर्षाचा मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

पुणे -

विश्रांतवाडीमध्ये 11 वर्षाचा मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

नागरिक आक्रमक रात्री काही वेळ केलं रस्ता रोको आंदोलन

१२ सप्टेंबरची घटना,बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय

Pandharpur दुष्काळी मोर्चानंतर पंढरपूरमध्ये भाजप- राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप

पंढरपूर -

दुष्काळी मोर्चानंतर भाजप- राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचा मोहिते पाटील यांच्यावर पलटवार

Pune:  पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत अपघात, भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक

पुणे-

पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत अपघात

एका भरधाव ट्रकने एकामागून एक तीन कार आणि एका बसला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही

मात्र, ट्रकच्या धडकेत तिन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com