lsg vs dc playing XI prediction lucknow super giants vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000 twitter
Sports

LSG vs DC, IPL 2024: लखनऊला हरवण्यासाठी दिल्लीच्या संघात होणार मोठा बदल? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Lucknow Super Giants vs Delhi Capitals Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना जिंकून लखनऊ सुपर जायंट्स संघाकडे टॉप ४ मध्ये टिकून राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत आगेकुच करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत १० व्या स्थानी आहे. तर ३ विजयांसह लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

कोण मारणार बाजी?

या स्पर्धेत लखनऊ सुपरजायंट्स संघाने शानदार खेळ करुन दाखवला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. या ३ पैकी २ सामने त्यांनी लखनऊच्या मैदानावर खेळताना जिंकले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. ही कामगिरी पाहता लखनऊचा वरचढ असल्याचं दिसून येत आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

लखनऊ सुपर जायंट्स-

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, यश ठाकुर, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, एम सिद्धार्थ.

इम्पॅक्ट प्लेअर- मोहसिन खान.

दिल्ली कॅपिटल्स -

डेव्हिड वार्नर, पृथ्वी शॉ,रिषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, ललित यादव, अक्षर पटेल, झाय रिचर्डसन, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिख डार/सुमित कुमार.

इम्पॅक्ट प्लेअर- जॅक फ्रेजर मॅकगर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT