CRICKET STORY 
Sports

Cricketer Sentenced To Death : क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू, ज्याला फाशीची शिक्षा झाली; वाचा नेमकं काय घडलं?

Leslie Hylton,Cricketer Sentenced To Death News: जगातील असा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोण होता तो क्रिकेटपटू? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Leslie Hylton: क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ मोठे रेकॉर्ड केले. काही रेकॉर्ड मोडले गेले. तर काही रेकॉर्ड असे आहेत जे आजही मोडलं जाणं कठीण आहे. यादरम्यान असेही काही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांना काहीना काही कारणामुळे तुरुंगात जावं लागलं आहे.

असे बरेच क्रिकेटपटू आहेत ज्यांनी गुन्हा केला आणि गुन्हा कबुल करुन तुरुंगात गेले.मात्र तुम्हाला असा क्रिकेटपटू माहित आहे का, जो हत्या करुन तुरुंगात गेला आणि त्यानंतर शिक्षा म्हणून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान कोण होता तो क्रिकेटपटू? आणि काय घडलं होतं? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी.

कोण होता तो खेळाडू?

वेस्टइंडीजचे खेळाडू म्हटले की, ते आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी आणि भेदक गोलंदाजीसाठी ओळखले जातात. मात्र याच संघात एक असा खेळाडू होता, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

या गोलंदाजाचं नाव होतं, लेस्ली हिल्टन. लेस्ली हिल्टन या खेळाडूचं नाव तुम्ही कधी ना कधी तरी ऐकलच असेल, हा असा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या क्रिकेटपटूने आपल्या पत्नीची हत्या केली होती. याच कारणामुळे त्याला फाशी झाली होती.

नेमकं काय घडलं होतं?

लेस्ली हिल्टनचा जन्म २९ मार्च १९०५ रोजी झाला होता. १९४२ मध्ये लेस्ली हिल्टनने लर्लिन रोजसोबत विवाह केला. १२ वर्ष सर्व काही सुरळीत राहिल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्याच्या पत्नीचा ड्रेस मेकिंगचा बिझनेस होता. त्यामुळे तिला सतत बाहेर जावं लागायचं. बरेच दिवस ती न्यूयॉर्कमध्ये राहायची. मात्र एक दिवस त्याला एक चिठ्ठी मिळाली. ज्यात असं काही लिहिलं होतं, जे ऐकून लेस्ली हिल्टनच्या पायाखालची जमीनच सरकली.

या चिठ्ठीत लेस्ली हिल्टनची पत्नी आणि ब्रुकलीन एवेन्यूमध्ये राहणाऱ्या रॉय फ्रांसिस यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं लिहिलं होतं. हा राग लेस्ली हिल्टनला सहन झाला नाही. तो गेला आणि खिडकीच्या जवळ असलेली बंदूक उचलली आणि त्याच्या पत्नीवर गोळी झाडली. त्यावेळी त्याला इतका राग आला होता की, त्याने रागाच्या भरात १ , २ नव्हे तर ७ गोळ्या झाडल्या होत्या.

पत्नीची हत्या करण्याच्या गुन्ह्यात लेस्ली हिल्टनला शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा होणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर १९३५ ते १९३९ दरम्यान त्याला वेस्टइंडीजसाठी त्याला ६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. याजदरम्यान त्याला १६ गडी बाद करता आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT