suryakumar yadav saam tv news
Sports

Suryakumar Yadav Injury: टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी! सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर

Suryakumar Yadav Injury Update: भारत- दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Injury Update:

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत सूर्यकुमार भारताचं नेतृत्व करताना दिसून आला होता. ऑस्ट्रेलियाचीविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Suryakumar Yadav News In Marathi)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी २० सामन्यात तो क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव गेल्या आठवड्यात भारतात परतला असून त्याचं स्कॅन करण्यात आलं. यादरम्यान त्याची दुखापत गंभीर असल्याचं दिसून आलं आहे. त्याची ही दुखापत पाहता तो जानेवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत खेळताना दिसून येणार नाही.

भारतीय संघाला मोठा धक्का..

येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची संघबांधणी सुरू आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणारी टी -२० मालिका ही या स्पर्धेपूर्वी होणारी शेवटची टी -२० मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत सूर्यकुमार यादवचं नसणं भारतीय संघासाठी चिंता वाढवणारं आहे. (Latest sports updates)

कधी झाला दुखापतग्रस्त?

भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने जोरदार शतक झळकावलं होतं.

त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेलं. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रविंद्र जडेजा संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. हा सामना भारतीय संघाने १०६ धावांनी जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT