IND vs SA, Test Series: टीम इंडियाला मोठा धक्का! द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून प्रमुख फलंदाज बाहेर

Ruturaj Gaikwad Ruled Out: या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.
team india
team indiagoogle
Published On

Ruturaj Gaikwad Ruled Out From Ind vs Sa Test Series:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळाला आहे. टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली.

तर वनडे मालिकेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २-१ ने विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.

ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर..

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापतग्रस्त झाली होती.

या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरु शकलेला नाही. माध्यमातील वृत्तात असं म्हटलं जात आहे की, दुखापतीतून सावरु न शकल्याने तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येणार नाही.या मालिकेतील पहिला कसोटी सामना येत्या २६ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. (Latest sports updates)

team india
IND vs SA,3rd ODI: 'सिंग इज किंग', द.आफ्रिकेत अर्शदीपचा मोठा कारनामा; अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

विराट परतला माघारी..

माध्यमातील वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की, कसोटी मालिका तोंडावर असताना विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आहे. यासाठी त्याने बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटकडून परवानगी घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी तो पुन्हा संघासोबत जोडला जाईल असं म्हटलं जात आहे.

शमी मालिकेतून बाहेर

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. शमीने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले होते. शमी कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. मात्र बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला खेळण्याची अनुमती न दिल्याने त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

team india
Ind vs Sa 3rd ODI: टीम इंडियाने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला जगातील दुसराच संघ

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com