IND vs SA Test Series: मोठी बातमी! भारत- द.आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

Dean Elgar Announced Retirement: येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.
dean elgar
dean elgarap photos
Published On

Dean Elgar Announced Retirement:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. तर वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला.

येत्या २६ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डीन एल्गरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. ही कसोटी मालिका त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची मालिका असणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (Dean Elgar Retired)

डीन एल्गर हा दक्षिण आफ्रिका संघातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. अखेर १२ वर्ष देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ८४ कसोटी सामन्यांमध्ये ३७.३ च्या सरासरीने १०८६० धावा केल्या आहेत. (Dean Elgar Stats)

यादरम्यान त्याने १३ शतकं आणि २३ अर्धशतकं झळकावली आहेत. तर ८ वनडे सामन्यांमध्ये त्याला १०४ धावा करता आल्या. त्याला वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही.मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. डीन एल्गरची निवृत्ती हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का आहे.

dean elgar
IND vs SA,3rd ODI: 'सिंग इज किंग', द.आफ्रिकेत अर्शदीपचा मोठा कारनामा; अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

याबाबत बोलताना डीन एल्गर म्हणाला की, 'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत निश्चित आहे. भारतीय संघाविरुद्ध मायदेशात होणारी कसोटी मालिका ही माझी शेवटची मालिका असणार आहे. कारण मी या सुंदर खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एक खेळ म्हणून क्रिकेटने मला खूप काही दिलं आहे. केप टाऊन कसोटी सामना हा माझ्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. हे माझं सर्वात आवडतं स्टेडियम आहे. कारण याच मैदानावर मी न्यूझीलंडविरुद्ध पहिली धाव केली होती. आशा करतो की, शेवटही चांगला होईल.'

dean elgar
Ind vs Sa 3rd ODI: टीम इंडियाने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला जगातील दुसराच संघ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com