lakshya sen twitter
Sports

Lakshya Sen: कोपरातून रक्त, प्रचंड वेदना; अखेरपर्यंत लढला, ब्राँझ हुकलं पण मनं जिंकली

Lakshya Sen Injury In Bronze Medal Match: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ब्राँझ मेडलसाठी झालेल्या सामन्यात लक्ष्य सेन दुखापतग्रस्त होता. मात्र तरीही तो शेवटपर्यंत लढत राहिला.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा ही युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसावी. २२ वर्षीय लक्ष्य सेन पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाला. ऑलिम्पिक स्पर्धेतील ज्या स्तरावर कुठलाही पुरुष बॅडमिंटनपटू पोहोचला नव्हता, त्या स्तरावर तो पोहोचला. गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहिलं. गोल्ड मेडलच्या अगदी जवळ पोहोचला. मात्र थोडक्यासाठी त्याचा सेमिफायनलमध्ये पराभव झाला.

हा पराभव विसरुन तो ब्राँझ मेडलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यातही त्याचा पराभव झाला. त्याची जिद्दी, त्याची चिकाटी संपूर्ण जगाने पाहिली. मात्र तो दुखापतग्रस्त असतानाही देशाला मेडल जिंकून देण्यासाठी लढत राहिला, हे खूप कमी लोकांना माहित असेल.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ब्राँझ मेडलच्या सामन्यात लक्ष्य सेनसमोर मलेशियाच्या ली झी जियाचं आव्हान होतं. दोघेही जिद्दी आणि चिकाटीने परिपूर्ण असलेले खेळाडू.दोघांमध्येही एक तू मग मी, असा सामना सुरु होता. सुरुवात लक्ष्य सेनने केली. पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेनने बाजी मारली. त्याने जियाचा २१-१३ ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये त्याने जियाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं.

पहिला सेटमध्ये लक्ष्य सेनने आघाडीवर तर जिया पूर्णपणे बॅकफूटवर होता. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने चांगली सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेट असताना त्याच्या कोपरातून रक्त वाहू लागला. त्यामुळे हा सामना थांबला. मैदानात फिजिओ आले आणि त्याच्या दुखापतीवर पट्टी बांधली. या दुखापतीनंतर लक्ष्यचं लक्ष भरकटलं असं जाणवलं.

कारण दुखापतीनंतर लक्ष्य पूर्णपणे बॅकफूटवर गेला. जियाने याच संधीचा फायदा घेतला आणि लक्ष्यवर हल्लाबोल केला. हा सेट लक्ष्यला १६-२१ ने गमवावा लागला. दरम्यान तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र जियाने आघाडी घेतली आणि आघाडी कायम ठेवली. हा सेट लक्ष्यला २१-११ ने गमवावा लागला. यासह लक्ष्यचं ब्राँझ मेडल जिंकण्याचं स्वप्न हुकलं.

लक्ष्य सेनचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास

लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात त्याने शानदार विजय मिळवला होता. मात्र विरोधी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्याचा हा सामना गृहीत धरला गेला नव्हता. साखळी फेरीत त्याने जुलीएन कॅरेगीचा २१-१९,२१-१४ ने पराभव केला होता. त्यानंतर पुढील सामन्यात त्याने जोनाथन ख्रिस्तीचा २१-१८, २१-१२ ने पराभव केला.

राऊंड ऑफ १६ मध्ये भारताचे दोन्हीस स्टार खेळाडू आमने सामने आले होते. त्याने एचएस प्रणॉयचा २१-१२,२१-६ ने एकतर्फी पराभव केला होता. उंपात्यपूर्व फेरीतील सामन्यात त्याने चिनी ताईपैच्या चो टियेन चेनचा १९-२१,२१-१५,२१-१२ ने पराभव केला होता. सेमिफायनलमध्ये त्याला विक्टर एक्सेलेसेनकडून २२-२०, २१-१४ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT