kusal mendis and virat kohli X (Twitter)
Sports

IND vs SL: 'मी त्याचं अभिनंदन का करु..?' विराटच्या ऐतिहासिक शतकावर श्रीलंकेच्या कर्णधाराचे अहंकारी बोल

Kusal Mendis On Virat Kohli Century: विराटच्या शतकी खेळीनंतर कुसल मेंडिसच्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ankush Dhavre

Kusal Mendis On Virat Kohli Century:

विराट कोहलीने रविवारी ईडन गार्डनच्या मैदानावर विक्रमी शतक झळकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४९ वे शतक झळकावले आहे.

यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विराट कोहलीने आपलं शतक पूर्ण केल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्वीट करत विराटचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने विराटला शुभेच्छा देण्यास नकार दिला आहे.

पत्रकार परिषद सुरु असताना कुसल मेंडिसला प्रश्न विचारण्यात आला की, विराटने ४९ वे शतक झळकावले आहे, तू त्याला शुभेच्छा देशील का? या प्रश्नावर उत्तर देत तो कुसल मेंडिस म्हणाला की,'मी का शुभेच्छा देऊ? कुसल मेंडिसने उत्तर देताच सर्वांना हसू आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

किंग कोहलीची विराट खेळी..

या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. तसेच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने कुमार संगकाराला मागे सोडत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १२१ चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार मारले.

विराटने २००९ मध्ये याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. या शतकी खेळीसह त्याने वाढदिवसाच्या दिवशी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, टॉम लेथम आणि मिचेल मार्श या खेळाडूंचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT