kuldeep yadav rinku singh x
Sports

IPL मध्ये राडा... कुलदीप यादवने एकदा नाही तर, दोनदा रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली; Video व्हायरल

DC Vs KKR IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतर कुलदीप यादव आणि रिंकू सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुलदीपने रिंकूच्या कानाखाली मारल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

IPL 2025 मधील ४८ वा सामना काल (२९ एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी गप्पा मारत होते. त्याच दरम्यान कुलदीप यादवने दोनदा रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली. ही घटना स्टेडियममधल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक आहे. तर रिंकू सिंह कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज आहे. काल दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना संपल्यानंतर कुलदीप आणि रिंकू गप्पा मारत होते. कोणत्या तरी गोष्टीवर रिंकू हसत होता. तेव्हा अचानक कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कुलदीप रिंकूला उद्देशून काहीतरी म्हणाला.

कुलदीपकडून मार खाल्यानंतर रिंकू संभाषण टाळण्यासाठी हसतो. पण नंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. तो हसता-हसता अचानक शांत होतो. तेवढ्यात कुलदीप यादव पुन्हा एकदा रिंकूच्या कानाखाली मारतो. यावेळेस रिंकू सिंहला राग अनावर होतो आणि तो कुलदीपकडे रागाने पाहतो. कुलदीप आणि रिंकूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन काहीजण कुलदीप यादववर टीका करत आहेत. दरम्यान त्यांच्यामध्ये मज्जामस्ती सुरु होती असे काहींचे मत आहे.

टॉस जिंकत दिल्लीच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये २०४ धावा केल्या. २०५ धावांचे लक्ष्य गाठणे दिल्लीला शक्य झाले नाही. दिल्लीच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये १९० धावा केल्या. या विजयानंतर कोलकाताचे आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळगड परिसरात बिबट्याचा अपघाती मृत्यू

'गृहराज्यमंत्र्यांकडून गँगस्टरला शस्त्रपरवाना, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT