Kuldeep Yadav Rinku Singh X
Sports

कुलदीप यादवनं रिंकू सिंहला दोनदा कानफटवलं; KKR नं शेअर केला दोघांचा नवा व्हिडिओ

Kuldeep Yadav Rinku Singh Video : दिल्ली विरुद्ध कोलकाता या सामन्यानंतर कुलदीप यादवने रिंकू सिंहला दोनदा कानाखाली वाजवली होती. त्यानंतर आता केकेआरने कुलदीप आणि रिंकू यांचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

Yash Shirke

Kuldeep Yadav Rinku Singh IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना काल (२९ एप्रिल) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये १४ धावांनी कोलकाताचा विजय झाला. दिल्लीने सलग दुसरा सामना गमावला. हा सामना संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्ली या संघातील खेळाडू गप्पा मारत होते. तेव्हा कुलदीपने रिंकू सिंहच्या दोनदा कानाखाली वाजवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कुलदीप यादव आणि रिंकू सिंह एकमेकांशी गप्पा मारत होते. रिंकू मोठ्याने हसत होता. अचानक कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. त्याला उद्देशून कुलदीप काहीतरी म्हणाला. लगेच रिंकूच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तो एकदमच शांत झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कुलदीप यादवने रिंकूच्या कानाखाली वाजवली. दुसऱ्यांदा मार खाल्यानंतर मात्र रिंकूला राग अनावर झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

व्हायरल व्हिडीओमुळे कुलदीप-रिंकू यांच्यात वाद झाल्याचे म्हटले जात होते. त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चाही सुरु झाल्या. याच दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कुलदीप यादव आणि रिंकू सिंह यांच्यात मस्ती सुरु असल्याचे पाहायला मिळाले. दोघांचे जुने फोटो, व्हिडीओ एकत्रित करुन व्हिडीओ तयार करण्यात आला. दोघेही कोलकाताच्या संघात होते आणि एकत्र खेळले होते. या व्हिडीओच्या मार्फत कुलदीप आणि रिंकू यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे केकेआरने संकेत दिले.

कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी २० ओव्हर्समध्ये २०४ धावा करत दिल्लीसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले. पण हे आव्हान दिल्लीला पार करता आले नाही. २०५ धावांचे लक्ष्य गाठत असताना दिल्ली कॅपिटल्सने १९० धावा केल्या. सलग दुसऱ्या पराभवामुळे दिल्लीचे नुकसान झाले आहे. तर विजयामुळे कोलकाताचे प्लेऑफमध्ये जाण्याचे आव्हान टिकून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT