India vs Australia 1st Test Update saam tv
क्रीडा

IND VS AUS 4th Test: रोहितमुळे संपणार स्टार खेळाडूची कारकीर्द! जोरदार फॉर्ममध्ये असूनही मैदानाबाहेर

भारतीय संघात एक असा खेळाडू आहे, जो अजूनही प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची वाट पाहतोय.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test Kuldeep yadav: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी करताना मोलाचे योगदान दिले आहे. मात्र गोलंदाजीत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये.

या मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माने मोहम्मद सिराजला संघाबाहेर करत मोहम्मद शमीला संधी दिली आहे मात्र आणखी एक असा खेळाडू आहे, जो अजूनही प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची वाट पाहतोय.(Latest sports updates)

हा खेळाडू पाहतोय संधी मिळण्याची वाट

भारतीय संघातील चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला या सामन्यतही संधी दिली नाहीये. या मालिकेसाठी त्याला आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलसह भारतीय संघात संधी दिली गेली आहे. मात्र चारही सामन्यांमध्ये त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.

कुलदीप यादवला बांगलादेश दौऱ्यावर कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. चटगाव कसोटीत त्याने फलंदाजी करताना ४० धावा केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना त्याने ८ गडी बाद केले होते. मात्र ही मालिका झाल्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.

अक्षर पटेल गोलंदाजीत फ्लॉप..

अक्षर पटेलने पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याला गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. तर गोलंदाजी करताना त्याला केवळ १ गडी बाद करता आला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT