Ravindra jadeja Saam tv news
क्रीडा

Ravindra Jadeja: राजकोट कसोटीत रविंद्र जडेजा खेळणार का? कुलदीप यादवने दिली मोठी अपडेट

India vs England 3rd Test: तिसऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना कुलदीप यादवने त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Fitness Update, India vs England 3rd Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हैदराबादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला होता.

त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून आला नव्हता. दरम्यान तिसऱ्या कासोटीपूर्वी त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी १० दिवसांचा अवधी मिळाला. आता तिसऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना कुलदीप यादवने त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

राजकोट कसोटीत जडेजा खेळणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात रविंद्र जडेजा खेळणार असे संकेत कुलदीप यादवने दिले आहेत. कुलदीप यादवच्या म्हणण्यानुसार रविंद्र जडेजा हा सराव करताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. दुसऱ्या कसोटीपूर्वी स्नायू ताणले गेल्याने त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना कुलदीप यादव म्हणाला की, ' मला वाटतं रविंद्र जडेजा खेळणार. त्याने सराव सत्रात सहभाग घेतला असून तो उपलब्ध आहे.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही पाहिलच असेल की,वेगवान गोलंदाज आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत आहेत. मात्र तुम्हाला यापुढेही टर्निंग विकेट्स पाहायला मिळतील असं मुळीच नाही.' इंग्लंडने सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत आक्रमक फलंदाजी केलं आहे. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने २८ धावांनी गमावला होता. तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने कमबॅक केलं आणि १०६ धावांनी विजय मिळवला.

सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. या कसोटीत भारतीय संघाला विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळावं लागणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT