Virat Kohli And Kl Rahul Argue After Match saam tv
Sports

Virat Kohli: हिशोब चुकता! केएल राहुल आणि विराट कोहली मैदानात भिडले, पाहा व्हिडिओ

Virat Kohli And Kl Rahul Argue After Match: रविवारी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची टीम मजबूत स्थितीत आहेत. टीमसोबत विराट कोहलीची बॅट देखीळ तळपतेय. रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यामध्ये सामना रंगला होता. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये कोहलीने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत टीमला विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यात विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा केएल राहुल यांच्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.

विराट कोहली फलंदाजी करत असताना ही घटना घडली होती. यावेळी भर मैदानात विराट कोहली आण केएल राहुलमध्ये बाचाबाची झाली. इतकंच नाही तर सामन्यानंतर देखील दोघांमध्ये नाराजी दिसून आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कोहली आणि राहुलमध्ये राडा

विराट आणि केएल राहुल एकमेकांचे चांगले मित्र आहे. हे दोघंही खेळाडू टीम इंडियाकडून एकत्र खेळतात. मात्र आयपीएलच्या सामन्यादरम्यान विराट कोहली कोणत्यातरी गोष्टीवरून नाराज असल्याचं दिसून आलं. आरसीबी फलंदाजी करत असताना ८ व्या ओव्हरमध्ये जेव्हा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता तेव्हा ही घटना घडली. दरम्यान मैदानावर कोहली आणि केएल राहुल यांच्यातील वाद तात्पुरता शांत झाला, मात्र सामन्यानंतर देखील दोघांमध्ये नाराजी दिसून आली. मात्र यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेंकाना मिठीही मारली.

काय आहे नेमकं प्रकरण?

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिययमध्ये दिल्लीने आरसीबीला १६३ रन्सचं आव्हान दिलं होतं. यावेळी आरसीबीकडून विराट कोहली टीमला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता. स्ट्रॅटिजिक टाईम आऊटवेळी विराट राहुलशी संतापाने बोलताना दिसला. ज्यावेळी या दोघांमध्ये वाद सुरु होता तेव्हा अंपायर देखील शांत करण्यासाठी पुढे सरसावले नाहीत. कोहली रागाच्या भरात केएल राहुलला काहीतरी सांगत होता.

आरसीबीने घेतला पराभवाचा बदला

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा बदला घेतला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने आरसीबीला त्यांच्या घरात घरवलं होतं. मात्र रविवारी आरसीबीने याचा बदला घेत दिल्लीच्या मैदानावर त्यांचा पराभव केला आहे. या विजयासह आरसीबीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT