Sanju samson vs Ishan Kishan saam tv
Sports

Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्ध ईशान नव्हे तर संजू का आहे परफेक्ट चॉईस? दोघांचा रेकॉर्ड एकदा पाहाच

India vs Pakistan Sanju samson vs Ishan Kishan: पाहा मध्यक्रमात खेळताना कसा राहिलाय दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड

Ankush Dhavre

Sanju Samson vs Ishan Kishan Comparison :

श्रीलंका आणि पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील हायब्रिड मॉडेल असल्याने भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. तर भारतीय संघ पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने आपली आशिया चषकाची मोहिम सुरु करणार आहे.

मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे केएल राहुल या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. त्यामुळे त्याच्याजागी कोण खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आह.

दुखापतग्रस्त असलेला केएल राहुल आशिया चषकातील सुरूवातीचे २ सामने खेळताना दिसून येणार नाही. भारतीय संघासोबत संजू सॅमसन देखील श्रीलंकेला रवाना झाला आहे. त्याला या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं आहे.

त्याला संघात स्थान देण्याचा पर्याय तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा केएल राहुल स्पर्धेतून बाहेर पडेल. तोपर्यंत त्याला भारतीय संघात स्थान देता येणार नाही. त्यामुळे भारतीय संघासमोर ईशान किशन हा एकमेव पर्याय आहे.

संजू सॅमसनची आकडेवारी...

भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा,शुभमन गिल आणि विराट कोहली सारखे अनुभवी फलंदाज आहेत. केएल राहुल बाहेर झाल्याने ईशान किशनला संघात स्थान दिलं जाईल. तो या संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसेल.

मात्र तो कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे अजूनही अस्पष्ट आहे. भारताचा टॉप ऑर्डर मजबूत असल्याने ईशान किशनला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे.

ईशान किशनचा डावाची सुरूवात करताना दमदार रेकॉर्ड राहिला आहे. तर वनडेत त्याला चौथ्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी

करण्याचा अनुभव नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ६ डावात केवळ एक वेळेस अर्धशतक झळकावले आहे. (Latest sports updates)

याउलट मध्यक्रमात खेळताना संजू सॅमसनचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. संजू सॅमसनने चौथ्या क्रमांकावर ५१ धावांची खेळी केली आहे. तर पाचव्या क्रमांकावर खेळताना त्याने १०४ धावा केल्या आहेत.

तसेच जर सातव्या क्रमांकावर खेळताना त्याचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने ११७ च्या स्ट्राइक रेटने आणि ९० च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत. त्यामुळे जर संजू सॅमसनचा रेकॉर्ड पाहिला तर,मध्यक्रमात खेळताना ईशान किशनपेक्षा संजू सॅमसनचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT