ipl retention twitter
Sports

IPL Retention 2025: KL Rahul ते Rishabh Pant; या स्टार खेळाडूंना फ्रेंचायझी करु शकतात रिलीझ

IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझी कोणत्या स्टार खेळाडूंना रिलीझ करु शकतात? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2025 Retention: आयपीएल रिटेंशनची डेडलाईन आज संपणार आहे. कोणता खेळाडू रिटेन होणार आणि कोणत्या खेळाडूला रिलीज केलं जाणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच उस्तुक आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मजबूत संघ बनवण्यासाठी फ्रेंचायझी काही धक्कादायक निर्णय घेऊ शकतात. काही स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

केएल राहुल

केएल राहुल हा गेल्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार होता. या हंगामात लखनऊचा संघ त्याला रिलीज करणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या हंगामातील एका सामन्यानंतर केएल राहुल आणि लखनऊचे संघमालक संजीव गोयंका यांच्यात बाचाबाची झाली होती.

त्यानंतर असं म्हटलं गेलं होतं की, केएल राहुल पुढच्या हंगामात या संघाकडून खेळणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुलने या संघाकडून मिळालेली १८ कोटींची ऑफर धुडकावून लावली आहे. त्यामुळे केएल राहुल ऑक्शनमध्ये दिसून येऊ शकतो.

श्रेयस अय्यर -

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली. मात्र यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्याला रिटेन करण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण त्याचा फॉर्म आणि फिटनेस चिंतेचा विषय ठरतोय. त्यामुळे तो देखील ऑक्शनमध्ये दिसून येऊ शकतो.

रिषभ पंत-

रिषभ पंत देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याला दिल्लीचा संघ रिटेन करणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. चेन्नई सुपर किंग्जने रिषभ पंतला आपल्या संघात घेण्यास रस दाखवला आहे.

फाफ डू प्लेसिस

फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र यावेळी हा संघ त्याला रिलीझ करु शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यावर भर देऊ शकतो, त्यामुळे यावेळी फाफ डू प्लेसिसला रिलीज केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

SCROLL FOR NEXT