IPL 2025: गुजरात टायटन्स शमीला डच्चू देणार? या तिघांना रिटेन करण्याच्या तयारीत
Mohammed Shami IPLyandex

IPL 2025: गुजरात टायटन्स शमीला डच्चू देणार? या तिघांना रिटेन करण्याच्या तयारीत

Gujarat Titans Retain Players: आगामी आयपीएल हंगामापूर्वी गुजरात टायटन्स संघ गुजरात टायटन्स संघाची साथ सोडू शकतो.
Published on

सर्व आयपीएल फ्रेंचायझींची खेळाडूंना रिटेन करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीला टाटा गुडबाय केला आहे. तर शुभमन गिलसह आणखी २ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025: गुजरात टायटन्स शमीला डच्चू देणार? या तिघांना रिटेन करण्याच्या तयारीत
IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा

गुजरातने या खेळाडूंना केलं रिटेन

गेल्या हंगामात हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सने संघाची साथ सोडल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी युवा फलंदज शुभमन गिलकडे सोपवली गेली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात गुजरातला चांगली कामगिरी करता आली नव्हती. माध्यमातील वृत्तानुसार,गुजरात टायटन्सचा संघ शुभमन गिल, राशिद खान आणि साई सुदर्शन यांना रिटेन करु शकतो. तर संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला रिटेन करण्याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

IPL 2025: गुजरात टायटन्स शमीला डच्चू देणार? या तिघांना रिटेन करण्याच्या तयारीत
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

काय आहे कारण?

मोहम्मद शमी हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तो आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला भारतीय संघात कमबॅक करता आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघातही शमीला स्थान देण्यात आलेलं नाही. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ स्पर्धेतही खेळताना दिसून आला नव्हता.

IPL 2025: गुजरात टायटन्स शमीला डच्चू देणार? या तिघांना रिटेन करण्याच्या तयारीत
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

अशी राहिलीये कारकिर्द

शमीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०१३ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. त्याने या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला या स्पर्धेत ११० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२७ गडी बाद केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com