kl rahul yandex
क्रीडा

KL Rahul,IPL 2025: केएल राहुलचा पत्ता कट होणार? हा दिग्गज खेळाडू होऊ शकतो लखनऊचा कर्णधार

KL Rahul LSG Captaincy: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी होणाऱ्या लिलावात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. दरम्यान केएल राहुलची कर्णधार पदावरुन सुट्टी होऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.

Ankush Dhavre

लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेत प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र शेवटच्या काही सामन्यांमध्ये पराभव झाल्याने या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघक कर्णधारासह आणखी काही स्टार खेळाडूंना रिलीझ करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलने संघाचे मालक संजीव गोयंका यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेत आयपीएल २०२५ स्पर्धेबाबत चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. त्यांनी सामन्यानंतर लाईव्ह कॅमेऱ्यासमोर केएल राहुलला झापलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील केली गेली होती.

हा वाद पेटल्यानंतर केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडणार,अशी चर्चा सुरु होती. मात्र माध्यमातील काही वृत्तांमध्ये असं म्हटलं जातंय की, केएल राहुलला रिटेन व्हायचं आहे. मात्र संघमालक त्याला रिटेन करणार नाहीये. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

लखनऊ सुपर जायंट्स संघाला कर्णधाराची गरज

लखनऊ सुपर जायंट्स संघ केएल राहुलला रिलीझ करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संघाला नव्या कर्णधाराची गरज असेल. दुसरीकडे रोहित शर्माही मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

त्यामुळे रोहित शर्मा लिलावात आला, तर लखनऊ सुपर जायंट्स संघ त्याच्यावर मोठी बोली लावून रोहितला आपल्या संघात घेऊ शकतो. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ अजूनही आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून लखनऊ सुपर जायंट्स संघ रोहित शर्मावर मोठी बोली लावू शकतो.

हे खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

लखनऊ सुपर जायंट्सने जर केएल राहुलला रिलीझ केलं. तर आणखी काही खेळाडू आहेत, जे कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. ज्यात निकोलस पुरन आणि कृणाल पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. दोघांनाही नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघ काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT