KL Rahul Retirement: केएल राहुलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम? त्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?

KL Rahul Retirement Post: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे, यामागचं सत्य? जाणून घ्या.
kl rahul
kl rahulyandex
Published On

KL Rahul Retirement, Fact Check: भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आपल्या सोशल मीडिया स्टोरीमुळे चर्चेत आला आहे. केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर होता. त्याला नुकताच झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळाली होती.

दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे, ज्यात केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या.

kl rahul
KL Rahul Retirement: केएल राहुलचा क्रिकेटला रामराम? व्हायरल पोस्टने खळबळ, नेमकं सत्य काय?

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असणाऱ्या केएल राहुलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली. ज्यात त्याने,' मी लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. लक्ष ठेवा..' असं लिहिलं. केएल राहुलची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. केएल राहुल नेमकी काय घोषणा करणार? अशी चर्चा देखील सुरू झाली.

नेटकऱ्यांनी अंदाजांचे पुल बांधायला सुरुवात केली. दरम्यान काही लोकांनी असा दावा केला आहे की, केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यापासून केएल राहुल ट्रेंड करतोय. केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. दरम्यान काहींचं म्हणणं आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे.

kl rahul
KL Rahul, IPL 2025: केएल राहुल लखनऊला करणार रामराम? या संघाचा कॅप्टन होणार

केएल राहुलच्या निवृतीची पोस्ट व्हायरल

केएल राहुलची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होताच, एक आणखी एक स्टोरी व्हायरल होऊ लागली आहे. ज्यात केएल राहुलने निवृत्ती घेतल्याचा दावा केला आहे. या पोस्टमध्ये असं लिहण्यात आलंय की, केएल राहुलने खूप विचार केल्यानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या पोस्टमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, त्याला देशासाठी खेळताना नेहमीच अभिमान वाटला आहे. मात्र त्याने आता आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पोस्ट खोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com