kl rahul twitte
Sports

KL Rahul, IPL 2025: केएल राहुल लखनऊला करणार रामराम? या संघाचा कॅप्टन होणार

KL Rahul To Leave Lucknow Super Giants: लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल २०२५ स्पर्धेत या संघाची साथ सोडू शकतो.

Ankush Dhavre

केएल राहुल हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याला लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली. नेतृत्व करताना त्याने या संघाला प्लेऑफमध्येही पोहोचवलं. मात्र आगामी हंगामात तो या संघाची साथ सोडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या संघाची साथ सोडून तो आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करू शकतो, असं माध्यमातील वृत्तांमध्ये म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सध्या फाफ डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करतोय. केएल राहुल या संघात येणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जर केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात प्रवेश केला, तर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

मालकांसोबत झाला होता वाद

आयपीएल २०२४ स्पर्धेत एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका केएल राहुलवर भडकताना दिसून आले होते. त्यावेळीही अशी चर्चा झाली होती की, हे केएल राहुलचे या संघाकडून शेवटचे हंगाम असेल. स्पोर्ट्सकिडाच्या वृत्तानुसार, केएल राहुलने लखनऊला टाटा बाय बाय करण्याचं मन बनवलं आहे.

अशी आहे कारकीर्द

केएल राहुल हा आयपीएल स्पर्धेतील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १३२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४६८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३७ अर्धशतक आणि ४ शतक झळकावले आहेत. गेल्या हंगामातही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने १४ सामन्यांमध्ये ५२० धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT