KKR vs SRH IPL FInal 2024 saam tv
Sports

KKR vs SRH, IPL 2024: यंदा विजय KKRचाच; हे ३ योगायोग जुळून आले तर विजयाची हॅट्ट्रिक पक्की !

KKR IPL Final Winning Factors: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा फायलनचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत हैदराबादचा पराभव निश्चित आहे. होय, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जेतेपदावर नाव कोरणार. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना?आम्ही इतक्या ठामपणे का सांगतोय. तर आतापर्यंत असे ३ योगायोग जुळून आले आहेत, जे संकेत देत आहेत की कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यंदा आयपीएलची ट्रॉफी उंचावणार. कोणते आहेत ते योगायोग? जाणून घ्या.

पहिला संकेत

आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आहे. पहिल्यांदा हे दोन्ही संघ साखळी फेरीतील सामन्यात भिडले होते. त्यानंतर क्वालिफायर १ सामन्यात कोलकाताने बाजी मारली आणि फायनलचं तिकीट मिळवलं.

कोलकाता नाईट रायडर्सला जिंकवणारा दुसरा संकेत

यंदा कोलकाता नाईट रायडर्स संघ बाजी मारणार. कारण गेल्या ६ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर २०१८ पासून २०२३ पर्यंत ज्या संघाने कवालिफायर १ चा सामना जिंकला आहे. त्याच संघाने फायनल जिंकली आहे.

हैदराबादचा पराभव निश्चित, तिसरा संकेत

यंदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ बाजी मारणार. याचं थेट कनेक्शन आयपीएल ट्रॉफीच्या फोटो शूटसोबत आहे. सामन्याच्या एक दिवसाआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांच फोटोशूट झालं. या फोटोशूटमध्ये श्रेयस अय्यर डाव्या बाजूला बसला आहे. २०१९ पासून ते २०२३ पर्यंत ज्या संघाचा कर्णधार ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा राहिला आहे. त्याच संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Stock Exchange : स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवण्याची धमकी, बिल्डिंगमध्ये ४ RDX बॉम्ब ठेवल्याचा ई मेल, पोलीस अलर्ट मोडवर

Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT