ms dhoni twitter
Sports

MS Dhoni, IPL 2025: धोनीसाठी IPL चा हा नियम बदलण्याची CSK ची मागणी; काव्या मारण म्हणाली, हा तर माहीचा अपमान

Kaviya Maran On Uncapped Rule: एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्ज संघात कायम ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान काव्या मारनने आयपीएलचा जुना नियम लागू करण्याला विरोध केला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये आपल्या आवडत्या संघातील स्टार खेळाडू दुसऱ्या संघात जातील. तर दुसऱ्या संघातील स्टार खेळाडू आपल्या आवडत्या संघात सहभागी होती. या मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझींचे मालक यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत नवीन नियम लागू करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यापैकीच एक नियम म्हणजे अन्कॅप्ड खेळाडूचा नियम. चेन्नई सुपर किंग्जकडून हा नियम लागू करण्याची मागणी करण्यात येत असली,तरीदेखील सनरायझर्स हैदराबादची संघमालक काव्या मारनने हा धोनीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

आयपीएल स्पर्धेत २००८ पासून ते २०२१ पर्यंत अन्कॅप्ड खेळाडूचा नियम लागू होता. आता हा नियम नेमका काय? आधी हे समजून घ्या. अन्कॅप्ड खेळाडूच्या नियमानुसार, ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ५ किंवा त्यापैकी अधिक वर्षे झाली आहेत. अशा खेळाडूचा आयपीएलमध्ये अन्कॅप्ड खेळाडू म्हणून समावेश केला जातो. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने हा नियम पुन्हा लागू करण्याची मागणी जोर लावून धरली आहे. कारण त्यांना एमएस धोनीचा अन्कॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश करायचा आहे.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये चेन्नईने धोनीला रिटेन केले होते. यावर्षी जर हा नियम लागू केला गेला तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ एमएस धोनीला कमी किंमतीत रिटेन करू शकतो.

चेन्नई सुपर किंग्जच्या मागणीला विरोध

चेन्नई सुपर किंग्जने ही मागणी केली असली तरी इतर फ्रेंचायझी हा नियम लागू करण्याच्या विरोधात आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाची संघमालक काव्या मारन हिचं म्हणणं आहे की, धोनीचा अन्कॅप्ड खेळाडू म्हणून संघात समावेश करणं हा त्याचा अपमान आहे.

धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ४ वर्षे झाली आहेत. निवृत्ती घेतल्यानंतर तो लवकरच आयपीएल स्पर्धेलाही रामराम करेल अशी चिन्हं होती. मात्र त्याने निवृत्त जाहीर केलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार तो आयपीएल २०२५ स्पर्धेतही खेळताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT