Kagiso Rabada IPL Record twitter/@pbks
क्रीडा

Kagiso Rabada IPL Record: रबाडाने मोडला IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड; मुंबई इंडियन्सच्या मलिंगालाही टाकलं मागे

Rabada IPL Record : पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आयपीएलचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Satish Daud

Kagiso Rabada fastest 100 Wickets Record : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १८ व्या सामन्यात एक मोठा विक्रम मोडला गेला आहे. गुरूवारी सायंकाळी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने-सामने आले होते. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने गुजरातसमोर विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातने १ चेंडू राखून पंजाबचा ६ विकेट्स राखून पराभव केला. पंजाबची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फ्लॉप ठरले. (Latest sports updates)

मात्र, यादरम्यान पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आयपीएलचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रबाडाने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आणि सिनियर खेळाडू लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आहे. (Latest Marathi News)

कगिसो रबाडाने गुजरातचा फलंदाज वृद्धिमान साहाची विकेट घेत आयपीएलमध्ये आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा तो अव्वल गोलंदाज ठरला आहे. यासह रबाडाने श्रीलंकेच्या अनुभवी लसिथ मलिंगाला मागे टाकले. मलिंगाने आपल्या ७० व्या आयपीएल सामन्यात १००वी विकेट घेतली होती.

रबाडाने सर्वात कमी चेंडूं टाकत घेतल्या १०० विकेट्स

कगिसो रबाडाने सर्वात कमी डावात  (IPL 2023) ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत कमीत कमी चेंडू टाकले आहेत. रबाडाने आयपीएलमध्ये १०० विकेट पूर्ण करण्यासाठी एकूण १४३८ चेंडू टाकले आहेत. यामध्ये, लसिथ मलिंगाचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने १६२२ चेंडूंमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारे खेळाडू

कगिसो रबडा - ६४ सामने

लसिथ मलिंगा - ७० सामने

भुवनेश्वर कुमार - ८१ सामने

राशिद खान - ८३ सामने

अमित मिश्रा - ८३ सामने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT