Kabaddi Player Death X
Sports

Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

Death News : राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिजेशला कुत्र्याचं पिल्लू चावलं होतं. लस न घेतल्याने ब्रिजेशला रेबीजची लागण झाली.

Yash Shirke

Kabaddi Player : क्रिडाविश्वातून दु:खद घटना समोर आली आहे. राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकीचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये ब्रिजेशने एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान कुत्र्याचे पिल्लू ब्रिजेशला चावले होते. साधी जखम म्हणत त्याने याकडे दुर्लक्ष केले आणि रेबीजविरोधी लस घेतली नाही. आता तीन महिन्यानंतर, रेबीजमुळे ब्रिजेश सोळंकीचे निधन झाले आहे.

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील खुरजाच्या फरना गावचा ब्रिजेश सोलंकी रहिवासी आहेत. मार्च महिन्यामध्ये त्याने गावातील नाल्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवले होते. यादरम्यान त्या पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला होता. किरकोळ जखम समजून ब्रिजेशने उपचार घेतले नव्हते.

काही दिवसांपूर्वी ब्रिजेशची तब्येत अचानक बिघडू लागली. सुरुवातीला ब्रिजेशचा हात सुन्न झाला, त्यानंतर त्याला अशक्तपणा वाटत होता. आजारी पडल्याने ब्रिजेशला अलीगढमधील जीवन ज्योती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीजची लक्षणे दिसल्यानंतर अलीगढ मेडिकल कॉलेजने ब्रिजेशवर उपचार करण्यास नकार दिला. यामुळे ब्रिजेशला मथुरा येथे नेण्यात आले.

मथुरेला ब्रिजेशवर आयुर्वेदिक उपचार सुरु करण्यात आले. पण त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. शेवटी ब्रिजेशला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ब्रिजेशला रेबीज झाल्याचे स्पष्ट केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिल्लीहून गावी परतत असताना वाटेतच ब्रिजेश सोलंकीचा मृत्यू झाला.

प्रो कबड्डी लीग खेळण्याचं स्वप्न

ब्रिजेश सोलंकी हा राज्यस्तरीय कबड्डीपटू होता. त्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. प्रो कबड्डी लीग २०२६ साठी ब्रिजेश तयारी करत होता. कबड्डी लीगमध्ये खेळण्याचे ब्रिजेशचे स्वप्न होते. त्याच्या निधनामुळे क्रिडा विश्वामध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT